वऱ्हाडी म्हणून लग्नात घुसायचे, पाहुण्यांच्या मौल्यवान वस्तुंवर डल्ला मारून व्हायचे फरार; पाच जणांना अटक
लग्नसमारंभामध्ये चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला मीरा-भईंदरमधून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून तब्बल 21 लाख 4 हजार 165 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ठाणे : लग्नसमारंभामध्ये चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला मीरा-भईंदरमधून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून तब्बल 21 लाख 4 हजार 165 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली असून, या टोळीमध्ये आणखी काही आरोपी आहेत का? याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोंपीवर ठाणे आणि मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत.
‘अशी’ होती आरोपींच्या चोरीची पद्धत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे आरोपी ज्या ठिकाणी लग्नसमारंभ होणार आहे, अशा स्थळांची रेकी करायचे. त्यानंतर लग्नाला आलेलेल्या पाहुण्यांप्रमाणे विवाहात सहभागी होत होते. लग्नाला आलेले वऱ्हाडी मंडळी आपल्या कामात आहेत, हे पाहून चोरटे संधी साधायचे. आरोपी लग्नाला आलेल्या पाहुण्यांच्या मोबाईल, पैसे आणि दागिन्यांवर डल्ला मारून फरार व्हायचे. अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात आल्या होत्या. पोलीस आरोपींच्या मागावर होते, अखेर या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. काशिमीरा पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
सर्व आरोपी 19 ते 23 वयोगटातील
विशेष म्हणजे या टोळीतील सर्व आरोपी हे 19 ते 23 वयोगटातील असून, त्यांच्यावर ठाणे आणि मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत. तांत्रिक बाबींचा तपास करून या टोळीतील पाच आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या टोळीमध्ये आणखी काही जणांचा समावेश आहे का? त्याचा तपास सुरू असून, या पार्श्वभूमीवर आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 21 लाख 4 हजार 165 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
कल्याणमध्ये शिवसेनेला खिंडार पडणार?, माजी आमदार भाजपच्या वाटेवर?; उलटसुलट चर्चांना उधाण