कल्याणमधील ख्यातनाम माजी नगरसेवकावर अपहरणाचा आरोप, वाचा प्रकरण नेमकं काय?
पैशांच्या कारणावरुन एका रिक्षा चालकाला अपहरण करुन मारहाण केल्याची घटना समोर आली आहे (Former independent corporator Kunal Patil accused of kidnapping in Kalyan)
कल्याण (ठाणे) : पैशांच्या कारणावरुन एका रिक्षा चालकाला अपहरण करुन मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ज्या दिवशी ही घटना घडली त्यादिवशी कुणाल पाटील दिल्लीत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कुणाल पाटील डोंबिवलीत कसं अपहरण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे (Former independent corporator Kunal Patil accused of kidnapping in Kalyan).
नेमकं प्रकरण काय?
कल्याण पूर्व भागातील देशमुख होम्समध्ये राहणारा सुमित सिंग या रिक्षा चालकाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार राजन दुबे या व्यक्तीकडून त्याने 30 हजार रुपये उसनवारीवर घेतले होते. बहुतांश रक्कम त्याने परत केली आहे. मात्र काही पैसे परत करणे बाकी होते. वेळेवर पैसे देऊ शकला नाही म्हणून राजन दुबे यांच्यासह त्याच्या सहकाराऱ्यांनी सुमित याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले आहे. या प्रकरणात डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले आहे.
कुणाल पाटील यांच्यावर आरोप काय?
या तक्रारीमध्ये अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आले आहेत. कुणाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सुमित याचे अपहरण करुन कुणाल पाटीलकडे घेऊन गेले. त्याठिकाणी पाटील यांनी त्याच्या थोबाडीत लगावून पैसे राजनला परत कर असे सांगितले. सुमितने त्याच्यासोबत घडलेल्या प्रकाराची तारीख 19 फेब्रुवारी सांगितली आहे. 19 फेब्रुवारी रोजी कुणाल पाटील हे दिल्लीला न्यायालयीन कामकाजासाठी गेले होते.
कुणाल पाटील यांची भूमिका काय?
“मला विनाकारण त्रास दिला जात आहे. जे आरोप लावले आहेत. त्यात काहीही तथ्य नाहीत. घटनेच्या दिवशी मी दिल्लीला होतो. पोलीस सखोल तपास करुन मला न्याय देतील. याआधीही माझ्याविरोधात अशी खोटी तक्रार केली गेली आहे. त्यात मी निर्दोष झालो आहे. इतकेच नाही तर जेव्हा मी दिल्लीला असल्याचा खुलासा केला तेव्हा फिर्यादीने पलटी मारली आहे. ही घटना 17 तारखेला घडली आहे. तपासात जे काही सत्य आहे ते समोर येईलच. मात्र, माझ्या कुटुंबियांसोबत मी खुलासा करणार आहे. ठाणे जिल्ह्यातील काही नेते माझ्या विरोधात कटकारस्थान करीत आहेत”, अशी भूमिका कुणाल पाटील यांनी मांडली (Former independent corporator Kunal Patil accused of kidnapping in Kalyan).
हेही वाचा : CCTV Video : मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी मध्यरात्री 1 वाजता पार्क!