Dombivali Attack : डोंबिवलीतील पत्रकार हल्ला प्रकरणी चार जणांना अटक, म्होरक्याचा पोलिसांकडून शोध सुरु

ज्या रिक्षातून हे आरोपी पळून गेले होते ती रिक्षा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने शोधून काढली. रिक्षा शोधल्यानंतर या प्रकरणातील आरोपी विशाल खांडेकर, अमोल सावंत, अनच आंग्रे यांना ताब्यात घेऊन टिळकनगर पोलिसांच्या हवाली केले. तरुणीलाही टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

Dombivali Attack : डोंबिवलीतील पत्रकार हल्ला प्रकरणी चार जणांना अटक, म्होरक्याचा पोलिसांकडून शोध सुरु
डोंबिवलीतील पत्रकार हल्ला प्रकरणी चार जणांना अटक
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 7:23 PM

डोंबिवली : पत्रकार श्रीराम कांदू(Shriram Kandu) हल्ला प्रकरणी कल्याण क्राईम ब्रांच(Kalyan Crime Branch)ने चार आरोपींना अटक केली असून या हल्ल्याचा म्होरक्या गौरव शर्माचा पोलीस शोध घेत आहेत. कांदू यांना मारहाण करण्यासाठी गौरव शर्मा याला कोणी आणि का सांगितले होते ? याचा खुलासा गौरव शर्माच्या अटकेनंतरच होणार आहे. कल्याण डोंबिवलीत गेल्या 30 वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात असलेले श्रीराम कांदू हे व्यावसायिक पण आहेत. त्यांचे डोंबिवलीतील टिळकनगर येथे स्वीट मार्टचे दुकान आहे. दिवसातून दोन तास ते त्या दुकानात बसतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी कांदू हे दुकानात बसले होते. एक तरुणी त्यांच्या दुकानात आली. तिने काही वस्तू खरेदी केल्या. बाहेर जाताना तिने दोन लोकांना कांदू यांच्या दिशेने इशारा केला. दोन जणांनी दुकानात घूसून कांदू यांना मारहाण केली. त्यानंतर ते निघून गेले. या प्रकरणाचा तपास टिळकनगर पोलिसांकडून सुरु आहे. या घटनेचा तपास क्राईम ब्रांच पोलीस सुद्धा करीत होते. (Four arrested in Dombivali journalist attack case, Police start searching for the main accused)

सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपी अटक, म्होरक्याचा शोध सुरु

डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी या घटनेचा निषेध करीत आरोपींच्या अटकेची मागणी केली होती. कल्याण क्राईमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाट यांनी पथक नेमून आरोपींना शोधण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. पोलीस अधिकारी भूषण दायमा, मोहन कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी गुरुनाथ जरग, विश्वनाथ माने, बालाजी शिंदे, गोरक्षक शेगडे यांच्या पथकाला मोठे यश आले. ज्या रिक्षातून हे आरोपी पळून गेले होते ती रिक्षा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने शोधून काढली. रिक्षा शोधल्यानंतर या प्रकरणातील आरोपी विशाल खांडेकर, अमोल सावंत, अनच आंग्रे यांना ताब्यात घेऊन टिळकनगर पोलिसांच्या हवाली केले. तरुणीलाही टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात चार आरोपी अटक झाले आहेत.

पोलीस तपासानंतरच हल्ल्याचे कारण स्पष्ट होईल

आरोपींना गौरव शर्मा नावाच्या व्यक्तीने कांदूवर हल्ला करण्यास सांगितले होते. गौरव शर्मा हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती आहे. त्याने असे का आणि कोणाच्या सांगण्यावरुन हे कृत्य केले आहे की यामागे काही राजकीय षडयंत्र किंवा भूमाफियांचा हात आहे का ? याचा खुलासा गौरव शर्माच्याअटकेनंतर होणार आहे. कांदू यांनी आयुष्यभर चांगली पत्रकारीता आणि समाजाच्या भल्यासाठी काम केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपासही पोलिसांनी करावा अशी मागणी केली आहे. (Four arrested in Dombivali journalist attack case, Police start searching for the main accused)

इतर बातम्या

Pimri chinchwad crime | खोट्या गुन्ह्याच्या आरोपामुळेच माझ्या नवऱ्याचा मृत्यू नगरसेविकेच्या आरोपामुळे खळबळ ; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

दुदैवी घटना ! राजमाची किल्यालगतच्या ढाक बहिरीच्या सुळक्यावरून पडून ट्रेकर्सचा मृत्यू ; आठवड्यातील दुसरी घटना

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.