बदलापूर प्रकरणातील चार मोठ्या अपडेट्स… काय काय घडलं?; A टू Z माहिती घ्या जाणून

बदलापूरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेतील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आला आहे. मात्र, या घटनेचा सर्वांनाच धक्का बसला आहे. आज राज्यभरात या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्यभर निदर्शने करत या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

बदलापूर प्रकरणातील चार मोठ्या अपडेट्स... काय काय घडलं?; A टू Z माहिती घ्या जाणून
फाईल चित्रImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 24, 2024 | 8:04 PM

बदलापूर येथे दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणी आज राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निदर्शने केली. स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते रस्त्यावर उतरले होते. राज्यभरात आज ठिकठिकाणी निदर्शने करून या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला होता. या प्रकरणातील आज चार महत्त्वाच्या अपडेट्सही आहेत. एसआयटी टीम आज पुन्हा बदलापुरात आली होती. या प्रकरणाची आज पुन्हा चौकशी करण्यात आली आहे. तसेच आरोपीच्या घरीही सर्च ऑपरेशन करण्यात आले आहे.

शाळेत कसून चौकशी

एसआयटीची टीम आज पुन्हा एकदा बदलापूरला आली होती. एसआयटीच्या प्रमुख आरती सिंह यांनी आज संबंधित शाळेत जाऊन तीन तास चौकशी केली. त्यांच्याकडून विविध अँगलने माहिती घेण्याचं काम केलं. आरती सिंह यांच्यासोबत गुन्हे शाखेचं पथक आणि फाँरेन्सिक टीमही या शाळेत दाखल झाली होती.

दोन्ही मुलींचे समुपदेशन करणार

बदलापूर दुर्घटनेतील या दोन्ही पीडित मुलींचे समुपदेशन करण्यात येणार आहे. तज्ज्ञ डॉक्टर या मुलींचे समुपदेशन करणार आहेत. एसआयटीने डॉक्टरांना केलेल्या विनंतीनुसार पीडित मुलींचं समुपदेशन होणार आहे. दोन्ही अल्पवयीन मुली सध्या मानसिक धक्क्यात असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी एसआयटीचे प्रयत्न सुरू आहेत. आठवड्यातून दोन ते तीन वेळा समुपदेशनाच्या माध्यमातून पीडित मुलींना धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

आरोपीच्या घरी सर्च ऑपरेशन

एसआयटीच्या टीमने आज आरोपी अक्षय शिंदे यांच्या घरी जाऊन सर्च ऑपरेशन केलं. खरवई गावदेवी परिसरात आरोपी राहतो. तब्बल पाऊणतास एसआयटीच्या टीमने त्याच्या घरात सर्च ऑपरेशन केलं. अक्षय शिंदेचा मोबाईल मिळत नसल्याने त्याचा मोबाईल शोधण्यासाठी त्याच्या घरी एसआयटीची टीम आली होती, असं सूत्रांनी सांगितलं. पोलिसांनी एका व्यक्तीला तोंडावर रुमाल बांधून त्याच्या घराजवळ आणलं होतं . त्याला सोबत घेऊन एसआयटीची टीम घरात दाखल झाली होती.

दहीहंडीला डीजे वाजवणार नाही

बदलापूर शहर चिमूकल्यांवरील अत्याचार प्रकरणानं हादरलेलं असतानाच आता बदलापूर साऊंड असोसिएशनने येत्या दहीहंडीला डीजेची कामं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बदलापूर साऊंड असोसिएशनने याबाबतचा निर्णय स्टेशन परिसरात बॅनर लावून जाहीर केला आहे. शहरात इतकी गंभीर घटना घडलेली असताना दहीहंडीला डीजे लावून गाणी वाजवणं चुकीचं असून त्यामुळेच यंदा आम्ही डीजेची कामं रद्द केल्याचं साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम गोरे यांनी सांगितलं आहे. पीडित मुलीला पाठिंबा म्हणून तसंच झालेल्या घटनेचा निषेध म्हणून हा निर्णय घेतल्याचं संग्राम मोरे यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.