कल्याणमधील तोडफोड प्रकरणी चौघे जण ताब्यात, आरोपींना पकडण्यासाठी तीन पोलीस पथके

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी वाढली आहे. चक्कीनाका, खडेगोळवली, कैलास नगर, चिकणीपाडा या परिसरात रात्रीच्या वेळेस टवाळखोर तरुण विनाकारण नागरिकांना त्रास देतात.

कल्याणमधील तोडफोड प्रकरणी चौघे जण ताब्यात, आरोपींना पकडण्यासाठी तीन पोलीस पथके
कल्याणमधील तोडफोड प्रकरणी चौघे जण ताब्यात
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 10:06 PM

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात काही तरुणांकडून दुकाने आणि वाहनांची तोडफोड करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोळसेवाडी परिसरात आरोपींना आळा घालण्यासाठी सर्व फरार आरोपींना पकडण्यासाठी तीन पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यात एकूण 17 आरोपी फरार आहेत. काही दिवसांपासून कोळसेवाडी परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांच्या विरोधात ठोस पावले उचलली जाणार अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे. (Four persons arrested in vandalism case in Kalyan, three police squads to nab accused)

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी वाढली आहे. चक्कीनाका, खडेगोळवली, कैलास नगर, चिकणीपाडा या परिसरात रात्रीच्या वेळेस टवाळखोर तरुण विनाकारण नागरिकांना त्रास देतात. रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मद्यधुंद अवस्थेत तरुण घराबाहेर पडतात. दारूच्या नशेत निष्पाप नागरिकांना मारहाण करतात, वाहनांची तोडफोड करतात, पोलीस कारवाई करतात. मात्र या टवाळखोर तरुणांना राजकीय पाठबळ असल्याने पोलिसांकडून ठोस पावले उचलण्यात अडचणी येतात. यामुळे तरुणांची डेरिंग वाढते आणि या तरुणांकडून गैर प्रकार घडतात.

गुरुवारी संध्याकाळी दुकान आणि वाहनाची केली तोडफोड

कल्याणच्या कैलास नगर परिसरात गुरुवारी संध्याकाळी विनाकारण काही तरुणांनी एका दुकानात आणि एका वाहनाची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीव्ही नाईनने ही बातमी दाखवली होती. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले. यातील फक्त एक आरोपी सज्ञान होता. बाकी इतर तीन आरोपी अल्पवयीन होते. मात्र या घटनेनंतर कल्याण परिमंडळ 3 डीसीपी विवेक पानसरे यांनी गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी कल्याणचे एसीपी अनिल पोवार यांना आदेश दिले. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात फरार असलेल्या आरोपींची धरपकड करण्यासाठी पोलिसांची तीन पथक नेमण्यात आली आहेत. लवकरात लवकर वॉन्टेड आरोपी पकडले पाहिजे यासाठी पोलीस टीम सज्ज झाली आहे. यापुढेही ठोस पावले उचलले जातील असे एसीपी अनिल पोवार यांनी सांगितले. (Four persons arrested in vandalism case in Kalyan, three police squads to nab accused)

इतर बातम्या

शेतकऱ्यांनो नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत दाखल करा, नुकसानभरपाईसाठी कुठे आणि कशी कराल तक्रार, जाणून घ्या

नितेश राणे आणि नीलम राणे विरोधात लूकआऊट सर्क्युलर, गृहमंत्री वळसे-पाटील काय म्हणाले?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.