Bhiwandi Crime : 45 लाख लूट प्रकरणी पुणे येथील तीन पोलिसांसह चौघांना अटक

औरंगाबाद येथील रामलाल मोतीलाल परमार हे 8 मार्च रोजी आपल्या ब्रिझा कारमधून नाशिक येथून व्यापाऱ्याची हवाला व्यवहारातील 5 कोटी रुपयांची रोकड विविध बॅगमध्ये घेऊन मुंबई येथे देण्यासाठी निघाले होते. यावेळी नारपोली पोलीस ठाणे हद्दीत हायवे दिवे येथील पेट्रोल पंपावर दबा धरून बसलेल्या तीन इसमांनी कार थांबवून कारमधील 45 लाख रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला.

Bhiwandi Crime : 45 लाख लूट प्रकरणी पुणे येथील तीन पोलिसांसह चौघांना अटक
45 लाख लूट प्रकरणी पुणे येथील तीन पोलिसांसह चौघांवर गुन्हा दाखल करत अटक
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 10:45 PM

भिवंडी : नाशिक मार्गे मुंबई येथे हवाला मार्गे रोख 45 लाख रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या कार चालकास सकाळी आठ वाजताच्या दरम्यान नाशिक मुंबई महामार्गावर एका आकोरीसह तीन पोलिसां (Three Police)नी लुटल्याची घटना घडली आहे. हायवेदिवे येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर तिघा अज्ञात इसमांनी कार अडवून पोलीस असल्याचे सांगत चालकाच्या ताब्यातील 45 लाख रुपयांची रोकड (Cash) घेऊन पोबारा केला. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी चारही आरोपींना अटक (Arrest) केली आहे. गुन्ह्यात समावेश असलेले तिघे पोलिस पुणे दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांना नारपोली पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी पोलिसांविरोधात लुटमारी प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने खळबळ माजली आहे. (Four persons, including three policemen from Pune, were arrested in a case of robbery of Rs 45 lakh)

नाशिकमधून मुंबईकडे रक्कम नेण्यात येत होती

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील रामलाल मोतीलाल परमार हे 8 मार्च रोजी आपल्या ब्रिझा कारमधून नाशिक येथून व्यापाऱ्याची हवाला व्यवहारातील 5 कोटी रुपयांची रोकड विविध बॅगमध्ये घेऊन मुंबई येथे देण्यासाठी निघाले होते. यावेळी नारपोली पोलीस ठाणे हद्दीत हायवे दिवे येथील पेट्रोल पंपावर दबा धरून बसलेल्या तीन इसमांनी कार थांबवून कारमधील 45 लाख रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला. या प्रकरणी 10 मार्च रोजी रात्री उशिरा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांचा गुन्ह्यात समावेश

पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे येथून बाबूभाई राजाराम सोळंकी यास ताब्यात घेतले असता या गुन्ह्याची उकल झाली. त्याची कसून चौकशी केली असता पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी गणेश शिंदे, गणेश कांबळे, दिलीप पिलाने यांचा गुन्ह्यात सहभाग निश्चित झाला. या तिघा जणांनी कार चालकास थांबवून त्याकडील रक्कम लुबाडली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस पथकाने शिताफीने या तिन्ही फरार असलेल्या आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. या सर्व चारही आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. (Four persons, including three policemen from Pune, were arrested in a case of robbery of Rs 45 lakh)

इतर बातम्या

Parbhani Accident : परभणीत बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात, 3 जण जागीच ठार

दारूच्या नशेत पठ्ठ्याने असं काही केलं की नागरिकांसह पोलीसही चक्रावले! वसईत नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.