‘निवडणुकीच्या कामाला जुंपलेल्या पोलिसांना अवघे 300 रुपये तर इतरांना 1100 रुपयांचा भत्ता’

'निवडणुकीच्या कामात सहभागी असणारे शासकीय कर्मचारी आणि पोलीस दल यांच्या भत्त्यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे दिसून आले आहे' (Government gives only 300 rupees allowance to police who work in election duty)

'निवडणुकीच्या कामाला जुंपलेल्या पोलिसांना अवघे 300 रुपये तर इतरांना 1100 रुपयांचा भत्ता'
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 3:08 PM

ठाणे : निवडणुकीच्या कामात सहभागी असणारे शासकीय कर्मचारी आणि पोलीस दल यांच्या भत्त्यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे साध्या शिपायास 1 हजार 100 रुपये भत्ता देण्यात येत असतानाच पोलिसांना केवळ 300 रुपये भत्ता दिला जात आहे. ही तफावत दूर करुन पोलिसांच्या निवडणूक भत्त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी ठामपाचे माजी स्वीकृत सदस्य नंदकुमार फुटाणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे (Government gives only 300 rupees allowance to police who work in election duty).

नंदकुमार फुटाणे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महापालिका, विधानसभा, लोकसभा आणि अन्य महामंडळांच्या निवडणूक कार्यक्रमात सरकारी अधिकारी कर्मचार्‍यांसोबत पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येत असते. मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्यासोबत पोलीस कर्मचारी यांनासुध्दा त्याठिकाणी पुर्णवेळ ड्युटी दिलेली असते (Government gives only 300 rupees allowance to police who work in election duty).

‘शिपाई आणि पोलीस कर्मचारी यांच्या भत्त्यामध्ये मोठी तफावत’

मतदान केंद्रावर शांतता आणि सुरक्षा राखणे, मतदान केंद्रामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही; तसेच, मतदान शांततेने पार पाडावे, याकरिता जबाबदारी या पोलीस कर्मचार्‍यांवर असते. या पोलिसांना केवळ 300 रुपये तर मतदान केंद्रावरील शिपाई कर्मचार्‍यास 1100 रुपये इतका भत्ता दिला जातो. शिपाई आणि पोलीस कर्मचारी यांना देण्यात येणार्‍या मतदान भत्त्यामध्ये मोठी तफावत चुकीचीच आहे. यामुळे पोलीस कर्मचार्‍यांमध्ये नाराजी आहे.

नंदकुमार फुटाणे यांचा इशारा

“विशेष म्हणजे पोलीस कर्मचारी या सरकारी यंत्रणेस नियमानुसार विचारणा करु शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सरकारी शिपाई व पोलिस यांच्यामध्ये मतदान केंद्रावर दिल्या जाणाऱ्या भत्ता रकमेतील असमानतेमुळे पोलीस कर्मचारी नाराज होतात व या नाराजीतून यापुढील मतदान केंद्रातील कामकाजावर त्यांचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करुन पोलिसांनाही इतर कर्मचार्‍यांप्रमाणेच समान भत्ता देण्यात यावा”, अशी मागणी फुटाणे यांनी केली आहे.

हेही वाचा : CBI अधिकाऱ्यांसाठी ‘ड्रेस कोड’, कार्यभार सांभाळताच सुबोध कुमार जयस्वालांचा निर्णय 

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.