मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर; तानसा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर

तानसा हे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक प्रमुख धरण आहे. आज या धरणातील पाण्याची पातळी 125.55 मी टिएचडीपर्यंत भरली आहे. या धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी 128.63 मी टिएचडी इतकी आहे.

मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर; तानसा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर; तानसा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 12:26 AM

शहापूर, सुनील घरत : मुंबईप्रमाणेच शेजारच्या ठाणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच आणखी एका धरणातील पाणीसाठ्याबाबत आनंदाची बातमी मिळणार आहे. पुढील अवघ्या 12 तानसा धरण भरून वाहू शकते. अर्थात हे धरण ओव्हरफ्लो होऊन वाहण्याच्या मार्गावर आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलावही ओसंडून वाहू लागला होता. मागील आठ दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याचा साठा वाढू लागला आहे. विहार तलावापाठोपाठ आता तानसा धरणही काठोकाठ भरून वाहण्याच्या मार्गावर असल्यामुळे मुंबईकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Great news for Mumbaikars; Tansa dam on the way to overflow)

तानसा हे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक प्रमुख धरण आहे. आज या धरणातील पाण्याची पातळी 125.55 मी टिएचडीपर्यंत भरली आहे. या धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी 128.63 मी टिएचडी इतकी आहे. त्यामुळे पुढील 12 तासांतच धरणातील पाणी ओसंडून वाहण्याची पातळी गाठू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तानसा धारण परिसर व नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे.

सातही धरणाच्या पातळीत समाधानकारक वाढ

शहापूर तालुक्यातील तानसा गावात हे तानसा धरण आहे. तानसा धरणातून मुंबईला दररोज 450 दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवणूक क्षमता साडेचौदा दशलक्ष लीटर इतकी आहे. मागील आठवडाभरापासून कोकणसह मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे सर्व सातही धरणाच्या पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईकरांचा पुढील वर्षभरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न याच महिन्यात दूर होऊ शकेल व पाणीटंचाईची चिंता दूर होईल, अशी शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस

जूनच्या अखेरीस थंड पडलेल्या पावसाने गेल्या तीन-चार दिवसांत ठाणे जिल्ह्याला मोठा तडाखा दिला आहे. शहरी भागांतील जनजीवन पूर्णपणे कोलमडून टाकले आहे. अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत. ठाणे शहरामध्ये एकूण पाऊस 1702.18 मिमी.च्या पुढे नोंद झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस जास्त आहे. गतवर्षी याचदरम्यान 1330.17 मिमी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. (Great news for Mumbaikars; Tansa dam on the way to overflow)

इतर बातम्या

7th Pay Commission News: 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख निवृत्तीवेतनधारकांची प्रतीक्षा संपली, सप्टेंबरपासून येणार वाढीव पगार

67 टक्के भारतीयांमध्ये कोरोना अँटीबॉडी, 40 कोटी लोकांना अद्यापही संसर्गाचा धोका, चौथ्या सिरो सर्वेत दावा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.