पिचकारीची बंदूक त्याला माहित नाही, अक्षय शिंदेच्या वडिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप

अक्षय शिंदे याचा एन्काऊंट केल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. तो तळोजा कारागृहात होता. बदलापूर पोलिसांकडून क्राईम ब्रांचकडे दिले जात असताना अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याला एन्काऊंट केल्याची माहिती पुढे येत आहे.

पिचकारीची बंदूक त्याला माहित नाही, अक्षय शिंदेच्या वडिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Sep 23, 2024 | 7:59 PM

अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याच्या पायावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. या प्रकरणात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. बदलापूरमधील या घटनेनं लोकं रस्त्यावर उतरले होते. लोकांनी मोठं आंदोलन केलं होतं. रेल्वे गाड्या रोखून धरल्या होत्या. आरोपीला फाशी देण्याची मागणी लोकांनी केली होती.

अक्षय शिंदेच्या वडिलांची प्रतिक्रिया

अक्षय शिंदेला मी ३.३० वाजता भेटून आलो. अक्षय शिंदेला पैसे घेऊन मारुन टाकले आहे. त्याला पिचकारीची बंदूक माहित नाही. मग तो काय पोलिसांची बंदूक घेऊन फायर करणार का. पोलिसांनी आम्हाला काहीही सांगितलं नाही. आता मी बातमी पाहिली तेव्हा मला कळाले. असा आरोप अक्षय शिंदेच्या वडिलांनी केली आहे.

विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘आरोपीला पकडण्यात उशीर केला होता. संस्थेतील पदाधिकारी जे आरोपी आहेत ते देखील अजून फरार आहे. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आरएसएस पर्यंत भाजपच्या मोठ्या नेत्यापर्यंत पोहोचलेले आहे.त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी शंका घेण्यास वाव आहे. गोळी पोलिसांनी झाडली का अशीही चर्चा आहे. पोलिसांच्या चौकशीचा हा भाग आहे. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि वास्तविकता लोकांसमोर याची अशी माझी मागणी आहे.’

नेमकं प्रकरण काय ?

अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याच्या पायावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. या प्रकरणात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. बदलापूरमधील या घटनेनं लोकं रस्त्यावर उतरले होते. लोकांनी मोठं आंदोलन केलं. रेल्वे गाड्या रोखून धरल्या होत्या. आरोपीला फाशी देण्याची मागणी लोकांनी केली होती. त्याच्यावर दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय शिंदे याने आधी गोळी झाडली. त्याने एकूण तीन गोळ्या फायर केल्या. एपीआय निलेश मोरे यांच्यावर अक्षय शिंदे याने गोळीबार केल्याची माहिती आहे. ज्यामध्ये ते जखमी झाले आहेत. बदलापूर पोलिसांकडून क्राइम ब्रँच अक्षय शिंदेचा ताबा घेत असताना ही घटना घडली.

'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?
'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?.
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?.
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?.
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी.
माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या डोक्यात..पवारांचा कोणावर निशाणा?
माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या डोक्यात..पवारांचा कोणावर निशाणा?.
धारावीतील तणावाला जबाबदार कोण? आरोप करत सोमय्यांनी थेट नावंच सांगितली
धारावीतील तणावाला जबाबदार कोण? आरोप करत सोमय्यांनी थेट नावंच सांगितली.
'शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू..', नितेश राणे नेमकं काय म्हणाले
'शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू..', नितेश राणे नेमकं काय म्हणाले.
'जिहादी-तिरंग्याचा काय संबंध...', जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा
'जिहादी-तिरंग्याचा काय संबंध...', जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा.
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य.
जलील यांची तिरंगा संविधान रॅली;रामगिरींसह राणेंबाबत केली ही मोठी मागणी
जलील यांची तिरंगा संविधान रॅली;रामगिरींसह राणेंबाबत केली ही मोठी मागणी.