देशातील राजकीय घडामोडींची साक्ष देणारा चिरेबंदी वाडा, वाचा वाड्याचा 139 वर्षांचा रंजक इतिहास

वसईतील होळी गावातील राऊत कुटुंबियांच्या वाड्याला 139 वर्ष पूर्ण झाली आहेत. वसईतील आणि देशातील अनेक घडामोडींची साक्ष देणारा हा वाडा अजूनही दिमाखात उभा आहे. पुरातन असलेला हा वाडा जतन करण्याचा संकल्प कुटुंबियांनी केला आहे.

देशातील राजकीय घडामोडींची साक्ष देणारा चिरेबंदी वाडा, वाचा वाड्याचा 139 वर्षांचा रंजक इतिहास
इतिहासाची साक्ष देणारा वाडा
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 7:36 PM

वसई : आपल्या महाराष्ट्राला मोठी इतिहासिक (History) परंपरा आहे. आपला इतिहास जगाच्या इतिहासात (Indian History) गौरवला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Mahraj) इतिहासही सर्वत्र सांगितला जातो. आपल्याला जशी मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. तशाच आपल्याकडे अनेक ऐतिहासिक वास्तूही आहेत. या वास्तुंचे जतन करण्याचे काम आपण करून ऐतिहासिक ठेवा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे अनेक गडकिल्ले आहेत. जे आजही जुन्या इतिहासाची साक्ष देतात. पूर्वीच्या काळीचे असेच काही भक्कम वाडेही उभा राहिले आहेत. ते आजही तेवढेच भक्कम उभे आहेत. वसईतील होळी गावातील राऊत कुटुंबियांच्या वाड्याला 139 वर्ष पूर्ण झाली आहेत. वसईतील आणि देशातील अनेक घडामोडींची साक्ष देणारा हा वाडा अजूनही दिमाखात उभा आहे. पुरातन असलेला हा वाडा जतन करण्याचा संकल्प कुटुंबियांनी केला आहे. आपल्याकडे जुन्या काही वाड्याला खूप महत्व असे. गावातल्या कारभाराचे मुख्य ठिकाणच जणू वाडा असायचे.

वाड्याने ब्रिटिशकाली इतिहासही पाहिला

या घराण्यातील भास्कर रघुनाथ राऊत यांनी या वाड्याचा तसेच कुटुंबाचा एक इतिहास लिहिला असून त्यावरून पुरावे उपलब्ध आहेत. 1883 साली शिवा राऊत यांनी हा वाडा बांधला. आज 139 वर्ष वाड्याला पूर्ण झाली तरी वाडा जुन्या बांधकाम पद्धती व इतिहासाची साक्ष देत आपल्या जागेवर उभा आहे. या वाड्याने स्वातंत्र्यपूर्व आणि आतापर्यंतचा काळ पहिला आहे. राऊत कुटुंबियांचा आधीपासूनच सामाजिक पिंड आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांचे पाय या वाड्याला लागले आहेत. त्याकाळी दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले भायजी जागू राऊत हे याच घरातील होत. या वाड्यात येणारा प्रत्येक जण वाड्याच्या प्रेमात पडतो. इंग्रजांची राजवटीत एका इंग्रज अधिकाऱ्याने या वाड्याला भेट दिली होती. राऊत घराण्याच्या इतिहासात त्याची नोंद आहे.

अजूनही अनेक सण वाड्यात साजरे होतात

राऊत कुटुंब जवळपास 160 जणांचे आहे. पूर्वीपासून राऊत कुटुंबिय दरवर्षी गणेशोत्सव , नवरात्रौत्सव ,दिवाळी अशा सणांना या वाड्यात एकत्र येतातच. सोमवंक्षी क्षत्रिय समजोन्नती संघाचे पहिले अधिवेशन याच वाड्यात झाले होते. ग्रामीण वसईची हा वाडा आजही ओळख करून देतो. अगदी इंग्रजांचा इतिहास पाहिलेला हा भक्काम वाडा नीट जपल्यास तो आपल्या आणखी काही पिढ्यांच्या इतिहासाचा साक्षीदारही होऊ शकतो. त्यामुळे अशा जुन्या वास्तुंचे जतन लक्ष देऊन करण्याची गरज आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु वीज वापरात लाखोंच्या घरात, किती लाखांचं वीजबिल?

“कुणाच्याच घराबाहेर आंदोलन करणं योग्य नाही”, मलिकांचं विधान, राष्ट्रवादीचा काँग्रेसला थेट विरोध?

‘शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आणि उद्या अवघा महाराष्ट्र बोलेल’, संजय राऊतांचा भाजप, केंद्रीय तपास यंत्रणांना निर्वाणीचा इशारा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.