Kalyan Sena-Bjp Contro : कल्याणात शिवसेना भाजपमधील सोशल मीडिया वॉर विकोपाला, शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यासह पतीला बेदम मारहाण

कल्याण पूर्व भागातील राहणाऱ्या आशा रसाळ या शिवसेनाच्या उपशहर प्रमुख आहेत. रसाळ या पत्नीसोबत 18 तारखेला रात्री जेवण करण्यासाठी कल्याण नजीकच्या बापगाव परिसरात एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. हॉटेलमध्ये गर्दी असल्याने त्या उभा होत्या. याच वेळी काही जण त्यांना शिविगाळ करत होते. आशा रसाळ यांचा आरोप आहे की, त्या ठिकाणी सात आठ जणांनी त्यांना आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली.

Kalyan Sena-Bjp Contro : कल्याणात शिवसेना भाजपमधील सोशल मीडिया वॉर विकोपाला, शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यासह पतीला बेदम मारहाण
कल्याणात शिवसेना भाजपमधील सोशल मीडिया वॉर विकोपालाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 12:24 AM

कल्याण : शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP)मध्ये सुरु असलेल्या सोशल मिडिया वॉर (Media War) विकोपाला गेल्याचे कल्याणात घडलेल्या एका घटनेवरून समोर आले आहे. शिवसेना महिला उपशहर प्रमुख आशा रसाळ यांना सात ते आठ जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाजप विरोधात सातत्याने सोशल मिडियावर लिहत असल्याचे सांगत टोळक्याने मारहाण केल्याचा आरोप आशा रसाळ यांनी केला आहे. मारहाण करताना एका तरुणाने मी माजी आमदार नरेंद्र पवार यांचा नातेवाईक असल्याचे सांगितल्याचे रसाळ यांनी तक्रारीत नमूद केलंय. तर याबाबत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घडलेला प्रकार निषेधार्ह आहे. मात्र या घटनेशी आमचा काडीमात्र संबंध नाही असा खुलासा केला आहे.

पतीसोबत हॉटेलमध्ये जेवायला गेल्या असताना हल्ला

कल्याण पूर्व भागातील राहणाऱ्या आशा रसाळ या शिवसेनाच्या उपशहर प्रमुख आहेत. रसाळ या पत्नीसोबत 18 तारखेला रात्री जेवण करण्यासाठी कल्याण नजीकच्या बापगाव परिसरात एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. हॉटेलमध्ये गर्दी असल्याने त्या उभा होत्या. याच वेळी काही जण त्यांना शिविगाळ करत होते. आशा रसाळ यांचा आरोप आहे की, त्या ठिकाणी सात आठ जणांनी त्यांना आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली. कोळसेवाडीतील घटनेनंतर तुम्ही सोशल मीडियावर जास्त टारगेट करीत आहात, असे आशा यांना सांगितले. इतकेच नाही तर त्या रिक्षातून कल्याण पश्चिमेतील निक्कीनगरात पोहचल्या. त्याठिकाणी येऊन सात ते आठ जणांच्या टोळक्याने मारहाण केली.

नरेंद्र पवार यांनी आरोप फेटाळले

मारहाण करणाऱ्या लोकांनी भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांचे नातेवाईक असल्याचे सांगितले. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही केस आता पडघा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे. पुढील तपास पडघा पोलीस करणार आहेत. याबाबत भाजपचे माजी आामदार नरेंद्र पवार यांना विचारले असता, या घटनेचा मी निषेध करतो. एका महिलेवर हल्ला करणे चुकीचे आाहे. यात माझा भाऊ पण असेल तर त्याच्यावर कारवाई झाली. पोलिसांनी निःपक्षपणे तपास केला पाहिजे. या घटनेची माझा काही संबंध नाही, असे स्पष्ट केले. (Husband beaten to death by Shiv Sena women office bearers for writing anti-BJP on social media)

हे सुद्धा वाचा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.