तीन महिन्यांपूर्वी विवाह, पत्नीच्या कामावर जाण्यावरून वाद, पतीने केले पत्नीवर चाकूने वार

शशिकांतला फरार व्हावे लागले. दुसरीकडे त्याची पत्नी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. सुखी संसार विस्कळीत झाला.

तीन महिन्यांपूर्वी विवाह, पत्नीच्या कामावर जाण्यावरून वाद, पतीने केले पत्नीवर चाकूने वार
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 1:25 PM

सुनील जाधव, प्रतिनिधी, ठाणे : ३५ वर्षीय रंजीता यांनी शशिकांत शेट्टी यांच्यासोबत दुसरा विवाह तीन महिन्यांपूर्वी केला. रंजीता या कल्याण पश्चिम शहाड परिसरात राहणाऱ्या, तर शशिकांत हे कल्याण वायले नगरमध्ये राहणारे. रंजीता ही मुंबईमधील एका कंपनीमध्ये काम करते. शशिकांत हे कल्याण पश्चिमेमधील वायलेनगर परिसरातच आईस्क्रीमचं दुकान चालवतात. लग्नानंतर रंजीताच्या कामावर जाण्याच्या कारणावरून शशिकांत नेहमी वाद घातलं होता. अश्याच प्रकारे गेल्या तीन दिवसांपूर्वी दोघात मोठ्या प्रमाणात वाद झाला. त्यानंतर त्रस्त झालेली रंजीताने शशिकांतचे घर सोडले. शहाड परिसरात राहणाऱ्या आपल्या आईच्या घरात राहण्यास गेली.

आईकडून कामावर जात असताना गाठले

आईकडे आल्यानंतरही रंजीता कामावर जात होती. त्यामुळे संतापलेल्या पती शशिकांतने आज पहाटे सात वाजेच्या सुमारास तिला थांबवले. रंजीता कामावर जात असताना शहाड परिसरात तिच्याशी वाद घातला. त्यानंतर तिच्या पाठीवर, हातावर, गळ्यावर छातीवर चाकूने सहा ते सात वार केले. पत्नीवर चाकूने वार केल्यानंतर तो फरार झाला.

रंजीता उपचारासाठी रुग्णालयात

परिसरातील काही नागरिकांनी धाव घेतली. जखमीं अवस्थेत असलेल्या रंजीताला उपचारासाठी रुग्णालय दाखल केले. सध्या रंजीताची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावरती उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस चौक पोलिसांनी तक्रार दाखल केली. दोन पथक तयार करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

एका 45 वर्षीय पतीने आपल्या पत्नीवर भर रस्त्यात चाकूने सहा ते सात वार केले. रंजीता शेट्टी असे जखमी पत्नीचे नाव आहे. शशिकांत शेट्टी असे हल्लेखोर पतीचे नाव आहे. सध्या गंभीर जखमी अवस्थेत पत्नी रंजीतावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पती-पत्नीचे वाद होत असतात. दोघेही कामावर जाणारे असले तर समंजसपणाची भूमिका घ्यावी लागते. अन्यथा छोट्याशा कारणावरून वाद होतात. अशाच प्रकारचा हा वाद झाला. यात शशिकांतला फरार व्हावे लागले. दुसरीकडे त्याची पत्नी रुग्णायात मृत्यूशी झुंज देत आहे. सुखी संसार विस्कळीत झाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.