ठाण्यात UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! मोठ्या प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळवण्याची संधी

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय प्रशासकीय सेवा परीक्षेचे निःशुल्क मार्गदर्शन करण्यात येते.

ठाण्यात UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! मोठ्या प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळवण्याची संधी
UPSC
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 5:01 PM

ठाणे : प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत अग्रगण्य नाव असलेल्या ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 2021 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शक वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. या मार्गदर्शन वर्गांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

प्रशासकीय सेवा परीक्षेचे निःशुल्क मार्गदर्शन

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय प्रशासकीय सेवा परीक्षेचे निःशुल्क मार्गदर्शन करण्यात येते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC) नागरी सेवा परीक्षा-2021 च्या मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 25 जुलै 2021 रोजी एक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. या प्रशिक्षण, मार्गदर्शन वर्गाच्या प्रवेश परीक्षेसाठी संस्थेच्या जाहिरातीत नमुद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन ( Online ) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

पात्र उमेदवारांची यादी 9 ऑगस्टला जाहीर होणार

20 जुलै 2021 रोजी अर्ज करण्यासाठी अंतिम दिवस आहे. 25 जुलै 2021 रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून 30 जुलै 2021 रोजी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर 3 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट 2021 या कालावधीत मुलाखती घेण्यात येणार आहे. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी 9 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

माहितीसाठी ‘या’ ठिकाणी भेट द्या

संस्थेच्या प्रवेश परीक्षेचे स्वरुप, अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती आणि सूचना संस्थेच्या नोटीस बोर्डवर तसेच संस्थेच्या www.cdinstitute.in आणि ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सुविधा

या प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. संस्थेचे अद्ययावत ग्रंथालय असून स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी जगभरातील नियतकालिके येथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ग्रंथालयासाठी दरवर्षी महापालिका प्रशासन पुस्तके खरेदी करते. तर सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत येथील अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली असून वायफाय इंटरनेट सुविधा देखील विनामूल्य देण्यात आली आहे.

हेही वाचा : दिव्याच्या म्हात्रे वाडीतील 250 कुटुंबे तब्बल 12 तास पाण्यात

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....