एमआयएमच्या शहराध्यक्षावर खंडणी आणि बलात्काराचे आरोप, इम्तियाज जलील यांची एसआयटी चौकशीची मागणी
एमआयएमचे भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्यावर झालेल्या खंडणी आणि बलात्काराच्या आरोपांची एसआयटीकडून चौकशी करावी, अशी मागणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलीय.
ठाणे : एमआयएमचे भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्यावर झालेल्या खंडणी आणि बलात्काराच्या आरोप झालेत. यावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी हे खोटे राजकीय आरोप असून पक्षाला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केलाय. तसेच या प्रकरणी सत्य बाहेर येण्यासाठी एसआयटीकडून चौकशी करावी, अशी मागणी केलीय. मागील 1 वर्षांपासून एमआयएमच्या शहराध्यक्षांवरील हे आरोप चर्चेचा विषय ठरत आहेत. अखेर जलील यांनी भिवंडी येथे खालिद गुड्डू कुटुंबियांसह कार्यकर्त्यांची भेट घेत भावना जाणून घेतल्या. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
इम्तियाज जलील म्हणाले, “एमआयएम भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्याविरोधात खोटे खंडणी व बलात्काराचे वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आलेत. शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत गुड्डू यांना जामीन मिळू नये यासाठी काम करत आहेत. खालिद गुड्डू याचे राजकीय प्रस्थ शहरात वाढत आहे. त्यामुळेच राजकीय पक्षांनी हे षडयंत्र रचले आहे. मी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांची मुंबई येथे भेट घेऊन या सर्व गुन्ह्यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे.”
“एमआयएम पक्षाची ताकद शहरात वाढत असून खालिद गुड्डू प्रकरणात न्याय न मिळाल्यास पोलीस उपायुक्त कार्यालया समोर पक्ष प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाईल,” असा इशाराही इम्तियाज जलील यांनी शेवटी दिला. यानंतर त्यांनी स्थानिक पक्ष पदाधिकारी यांचे गाऱ्हाणे ऐकून घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा :
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या मुलाची टी-शर्ट घालून मोदींवर उपरोधिक टीका
Imtiyaz Jaleel यांच्याविरोधात भाजपकडून तक्रार दाखल, अटकेची मागणी
मंदिरं उघडण्यासाठी एमआयएम आक्रमक, औरंगाबादेत मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देणार
व्हिडीओ पाहा :
Imtiyaz Jaleel demand SIT inquiry of allegation of extortion and rape on MIM leader