Dombivali Crime: मोटारसायकलने फोडले लूटीचे बिंग, चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक

या चोरट्यांनी गुन्ह्याच्या वेळी मोटर सायकल, बूट आणि कपडे घातले होते. बहुतांश गुन्ह्यात तीच बाइक, कपडे घातलेले दिसून आले. पोलिस या दोघांच्या शोधात होते. अचानक एका ठिकाणी पोलिसांना एक मोटर सायकल दिसली ही मोटर सायकल तीच होती जी सीसीटीव्हीमध्ये चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात वापरली गेली होती.

Dombivali Crime: मोटारसायकलने फोडले लूटीचे बिंग, चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक
मोटारसायकलने फोडले लूटीचे बिंग
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 3:33 PM

डोंबिवली : मोटरसायकलमुळे चैन स्नॅचिंग करणाऱ्या चोरांचे बिंग फुटले आहे. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी 50 सीसीटीव्ही तपासले. अखेर दोन चैन स्नॅचरला पकडण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे गुन्ह्यासाठी वापरत असलेल्या मोटरसायकलमुळे हे दोघे पकडले गेले आहेत. त्यांच्याकडून दहा गुन्हे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून 14 तोळे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

गुन्हे घडलेल्या परिसरातील 50 सीसीटिव्ही तपासले

कल्याण डोंबिवलीत चैन स्नॅचिंगच्या घटनेत चांगलीच वाढ झाली आहे. विशेष करुन डोंबिवलीत अनेक गुन्हे घडेल आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, एसीपी जे. डी. मोरे, सिनिअर पीआय शेखर बागडे यांनी आरोपीला शोधण्यासाठी पोलीस अधिकारी अविनाश वनवे आणि पोलीस अधिकारी सुरेश डांबरे यांच्या नेतृत्वात पोलिसांचे एक विशेष पथक तयार केले. या दोघा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तपास सुरु केला. पोलिसांनी ज्या भागात स्नॅचिंगचे गुन्हे घडले होते. त्या परिसरातील जवळपास 50 सीसीटीव्ही तपासले. यात पोलिसांना दोन चोरटे एका बाईकवर दिसत होते.

बाईकमुळे चोरटे जेरबंद

या चोरट्यांनी गुन्ह्याच्या वेळी मोटर सायकल, बूट आणि कपडे घातले होते. बहुतांश गुन्ह्यात तीच बाइक, कपडे घातलेले दिसून आले. पोलिस या दोघांच्या शोधात होते. अचानक एका ठिकाणी पोलिसांना एक मोटर सायकल दिसली ही मोटर सायकल तीच होती जी सीसीटीव्हीमध्ये चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात वापरली गेली होती. बाईकची खात्री पटवून पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला दोन तरुण त्या बाईकवर बसून निघण्याच्या तयारीत होते. याचवेळी पोलिसांनी त्यांना पकडले.

लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाल्याने सुरु केला लुटीचा धंदा

पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता. हेच ते दोघे होते. ज्यांना मानपाडा पोलिसांचे तपास पथक शोधत होते. मनोज ठाकूर आणि विकेश तिवारी अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही उत्तरप्रदेशचे आहे. हे दोघे ठिकाणी काम करीत होते. लॉकडाऊनननंतर बेरोजगार झाल्यावर त्यांनी लूटीचा धंदा सुरु केला. त्यांच्याकडून दहा गुन्हे उघडकीस आणले असून 14 तोळे सोने हस्तगत केले आहेत. (In Dombivali, police arrested two persons for snatching a chain with the help of CCTV)

इतर बातम्या

ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर खुजलीची पावडर ओतली, हातात होती दोन लाखांची बॅग… परळीत धक्कादायक प्रकार

भीषण! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसची ट्रकला समोरुन जोरदार धडक, 15 जण ठार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.