AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan CCTV : कल्याणमध्ये गुन्हेगारांवर व्यापारी-पोलिसांचा ‘तिसरा डोळा’, मोक्याच्या ठिकाणी लावणार सीसीटीव्ही कॅमेरे

व्यापारी वर्गाने दिलेल्या सहकार्यातून बाजारपेठ परिसरातील मोक्याच्या ठिकाणी 25 सीसीटीव्ही कार्यक्रम बसविले जाणार आहेत. एक कॅमेरा देशासाठी आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याची बाब वरिष्ठ पोलिस निरीक्षक होनमाने यांनी अधोरेखित केली. तिसरा डोळा कार्यान्वीत झाल्याने बाजारपेठ परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यावर देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. तसेच काही गुन्हा घडल्यास आरोपी पकडण्याकरीता सीसीटीव्हीची मदत होणार आहे.

Kalyan CCTV : कल्याणमध्ये गुन्हेगारांवर व्यापारी-पोलिसांचा 'तिसरा डोळा', मोक्याच्या ठिकाणी लावणार सीसीटीव्ही कॅमेरे
कल्याणमध्ये गुन्हेगारांवर व्यापारी-पोलिसांचा 'तिसरा डोळा'
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 4:00 PM

कल्याण : कल्याण शहर ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने शहरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसविण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ आज पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. ‘एक कॅमेरा देशासाठी आणि समाजासाठी‘ या संकल्पनेतून हे सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. जेणेकरून गुन्हेगारी (Crime)ला आळा बसण्यास मदत होईल. कल्याण-डोंबिवली शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एकीकडे पोलिस दिवसरात्र प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे आता व्यापारी देखील पोलिसांच्या मदतीला पुढे आले आहेत. एक कॅमेरा देशासाठी आणि समाजासाठी ही संकल्पना पोलिसांनी सुरू केली आहे. कल्याणचे ॲडिशनल सीपी दत्तात्रेय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना संपूर्ण शहरात राबवली जात आहे. (In Kalyan, CCTV cameras will be installed at strategic places by traders and police)

नव्या संकल्पनेला व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद

या संकल्पनेला कल्याण-डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. कल्याण पश्चिमेतील सर्वात महत्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी 25 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. त्याचा शुभारंभ आज कल्याणमध्ये करण्यात आला. भाजी मार्केटमधील एका हॉटेलच्या सभागृहात आयोजित सभारंभात वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने, पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राकेश मुथा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी कल्याणमधील सर्व व्यापारी उपस्थित होते.

मोक्याच्या ठिकाणी 25 सीसीटीव्ही बसवणार

व्यापारी वर्गाने दिलेल्या सहकार्यातून बाजारपेठ परिसरातील मोक्याच्या ठिकाणी 25 सीसीटीव्ही कार्यक्रम बसविले जाणार आहेत. एक कॅमेरा देशासाठी आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याची बाब वरिष्ठ पोलिस निरीक्षक होनमाने यांनी अधोरेखित केली. तिसरा डोळा कार्यान्वीत झाल्याने बाजारपेठ परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यावर देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. तसेच काही गुन्हा घडल्यास आरोपी पकडण्याकरीता सीसीटीव्हीची मदत होणार आहे. कॅमेऱ्यामुळे 24 तास तिसऱ्या डोळ्याच्या माध्यमातून सुरक्षेची हमी मिळणार आहे. महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच पोलिस बीट आहेत. या पाच पोलिस बीटमध्ये व्यापारी आणि नागरिकांच्या सहभागातून 394 ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. या सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यास मदत होत असल्याचे होनमाने यांनी सांगितले. (In Kalyan, CCTV cameras will be installed at strategic places by traders and police)

इतर बातम्या

CCTV | डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनविना औषध देण्यास नकार, नशेखोरांनी केमिस्टचे दुकान फोडले

व्याजाच्या पैशातून वादावादी, कर्जदारांकडून तरुणाची हत्या, पुरावे नसताना पोलिसांनी तिघांना पकडलं

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....