Kalyan Electricity Bill : कल्याण डोंबिवली परिसरात 113 विजचोरीचे गुन्हे दाखल तर 200 गुन्हे प्रलंबित, थकबाकी भरण्याचे नागरिकांना आवाहन

गुन्हे दाखल करण्यापूर्वी संबंधित नागरिकांशी संपर्क साधत त्यांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी सूचना देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. होनमाणे यांनी थकबाकीदारांची यादी महावितरणकडून मागून घेत पोलीस ठाण्यामार्फत त्यांच्याशी संपर्क साधला. या थकबाकीदारांना थकबाकीची कल्पना देत चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. आज झालेल्या बैठकीत जवळपास सर्व थकबाकीदार, महावितरणचे अधिकारी, पोलीस उपस्थित होते.

Kalyan Electricity Bill : कल्याण डोंबिवली परिसरात 113 विजचोरीचे गुन्हे दाखल तर 200 गुन्हे प्रलंबित, थकबाकी भरण्याचे नागरिकांना आवाहन
कल्याण डोंबिवली परिसरात 113 विजचोरीचे गुन्हे दाखल तर 200 गुन्हे प्रलंबितImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 6:14 PM

कल्याण : महावितरण वीजचोरी (Electricity Theft) आणि थकबाकीदारांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कल्याण परिमंडळ 3 या पोलीस उपायुक्त झोन मध्ये येणाऱ्या 8 पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2021 मध्ये 196 तर 2022 मे अखेरपर्यंत 113 विजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून मागील 200 गुन्हे प्रलंबित (Pending) आहेत. हे सर्व गुन्हे महावितरणकडून महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल झाल्यांनतर चौकशी आणि वसुलीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग केले जातात. मात्र यासाठी बराच कालावधी लागत असल्याने वेळ वाया जात असून थकबाकीदार नागरिकांना देखील गुन्हे झेलावे लागतात. हे टाळण्यासाठी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी महावितरणच्या अधिकारी आणि थकबाकीदारांची बैठक घेत लवकरात लवकर थकबाकी भरणा करण्याचे आवाहन (Appeal) केले. उपस्थित सर्व थकबाकीदारांनी तडजोडीची रक्कम भरण्यास तयारी केल्याने महावितरणच्या थकबाकीदाराची यादी घटण्याची आशा निर्माण झाली आहे.

थकबाकीदार, महावितरणचे अधिकारी आणि पोलिसांमध्ये बैठक

गुन्हे दाखल करण्यापूर्वी संबंधित नागरिकांशी संपर्क साधत त्यांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी सूचना देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. होनमाणे यांनी थकबाकीदारांची यादी महावितरणकडून मागून घेत पोलीस ठाण्यामार्फत त्यांच्याशी संपर्क साधला. या थकबाकीदारांना थकबाकीची कल्पना देत चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. आज झालेल्या बैठकीत जवळपास सर्व थकबाकीदार, महावितरणचे अधिकारी, पोलीस उपस्थित होते. या बैठकीत थकबाकीदारांना लवकरात लवकर थकबाकी भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले. थकबाकी न भरल्यास गुन्हे दाखल करत वसुलीसाठी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. उपस्थित सर्व थकबाकीदारांनी तडजोडीची रक्कम भरण्याची तयारी या बैठकीत दाखवली. यामुळे महावितरणच्या थकबाकीदाराची यादी घटण्याची आशा निर्माण झाली आहे. (In Kalyan Dombivali area 113 cases of power theft have been registered while 200 cases are pending)

हे सुद्धा वाचा

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.