Bread Rates | सामान्यांचा नाष्टा महाग, कल्याण-डोबिंवलीत पावचे दर वाढले, बेकरी चालकांचा निर्णय

Bread Rates | सर्वसामान्यांचा नाष्टा महागला आहे. कल्याण डोबिंवलीत बेकरी चालकांनी पावाचे दर वाढवले आहेत. पावाच्या एका लादीमागे 4 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Bread Rates | सामान्यांचा नाष्टा महाग, कल्याण-डोबिंवलीत पावचे दर वाढले, बेकरी चालकांचा निर्णय
पावाने खाल्ला भावImage Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 1:13 PM

Bread Rates | शहरी असो वा ग्रामीण भाग, सकाळच्या नाष्टयाला (Breakfast) पाव हा लागतोच. त्यात वडा पाव, वडा समोसा, भजी पाव, अंडा भुर्जी, मिसळ पाव अशा रुचकर पदार्थांना पावाशिवाय काही सर येत नाही. इतकंच काय कल्याणचा मलई पावही (Malai Pav) खूपच प्रसिढ आहे . नुसत नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पण आता खाद्यप्रेमींना (Food Lovers) पावाचा मोह थोडा आवरावा लागणार आहे. कारण बेकरी चालकांनी पावाचे दर वाढवण्याचा (Bread Rates Hike) निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमचं पावपुराण ही महागणार आहे. आता पावाचेचं भाव वाढल्याने या नाष्ट्याची किमतीही वाढणार आहे. पण आता पावाचेच भाव वाढले असल्याने सामान्याच्या खिशाला आणखी भुर्दंड पडणार आहे. का वाढले पावाचे भाव? आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांनी याचा आढावा घेतला आहे.

काय घेतला आहे निर्णय

कल्याण डोबिंवलीतील बेकरी चालकांनी पावाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पावाच्या एका लादीमागे 4 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय बेकरी चालकांनी घेतला आहे. मैदा,तेल व बेकरी उत्पादन तयार करणाऱ्या कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणात भाववाढ झाल्याने नाईलाजाने हा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण, डोंबिवली, शहाड, विठ्ठलवाडी, आंबिवली, टिटवाळा परिसरातील 40 ते 45 बेकरी चालक आणि मालकानी बैठक घेऊन हा  निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

बेकरी व्यवसायावर संकट

मैदा, तेल व बेकरी उत्पादन तयार करणाऱ्या कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली आहे. परिणामी बेकरी व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यामुळे, बेकरी व्यवसायावर मोठे संकट आल्याने पावाच्या लादीमागे पाच ते सात रुपयांची वाढ करण्याचा निर्णय बेकरी चालकाने घेतला आहे. भाव वाढी साठी कल्याण, डोंबिवली, शहाड, विठ्ठलवाडी, आंबिवली, टिटवाळा परिसरातील 40 ते 45 बेकरी चालक आणि मालकांनी भाव वाढीची चर्चा केली. या चर्चेत महिन्यापूर्वी मिळणारी मैदा गोणी आता 1600 ते 1700 रुपयांना मिळत आहे. त्याचबरोबर, तेल, लाकडी इंधन, वीज पुरवठा याचेही भाव वाढले आहेत. या पावाच्या किमतीमध्ये 4 ते 5 रुपये दरवाढ करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. आता नवीन दर प्रमाणे 4 रुपये एका लादी पावा मागे वाढ करण्यात आलीये. आता हे नवीन दर लागलीच अंमलात येणार आहे.  त्यामुळे रविवारी मस्तपैकी आवडीच्या समोसा पाव, वडापाव, मलई पाव, मिसळ पाववर मनसोक्त तावा हाणताना खिश्याचा ही थोडा विचार करा. नवीन दर कदाचित उद्यापासूनच लागू होतील.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.