Thane Murder : धक्कादायक ! नाश्ता दिला नाही म्हणून सासऱ्याकडून सुनेची गोळी झाडून निर्घृण हत्या
राबोडी परिसरातील ऋतू पार्कमध्ये पाटील कुटुंबीय राहतात. सीमाने गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास सासरा काशिनाथला चहा दिला. मात्र नाश्ता दिलाच नाही. यावरून सासरा आणि सुनेमध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर रागाच्या भरात सासऱ्याने परवाना असलेले रिव्हॉल्व्हर बाहेर काढले आणि सुनेच्या पोटावर गोळी झाडली.
ठाणे : सुनेने नाश्ता वाढला नाही म्हणून संतापलेल्या सासऱ्या( Father-in-Law)ने गोळी झाडून सुने (Daughter-in-Law)ची निर्घृण हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी ठाण्यातील राबोडी परिसरात घडली आहे. सीमा पाटील असे हत्या करण्यात आलेल्या सासऱ्याचे नाव आहे तर काशिनाथ पाटील (76) असे हत्या करणाऱ्या सासऱ्याचे नाव आहे. गोळीबारात सीमा पाटील या गंभीर झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (In Thane father-in-law shot dead daughter in law for not giving him breakfast)
सुनेच्या पोटात गोळी झाडली, उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू
राबोडी परिसरातील ऋतू पार्कमध्ये पाटील कुटुंबीय राहतात. सीमाने गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास सासरा काशिनाथला चहा दिला. मात्र नाश्ता दिलाच नाही. यावरून सासरा आणि सुनेमध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर रागाच्या भरात सासऱ्याने परवाना असलेले रिव्हॉल्व्हर बाहेर काढले आणि सुनेच्या पोटावर गोळी झाडली. जखमी सुनेला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी सासरा फरार असून राबोडी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. (In Thane father-in-law shot dead daughter in law for not giving him breakfast)
इतर बातम्या