उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचं निधन, मोदी लाटेतही राष्ट्रवादीकडून विजय

उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती पप्पू कलानी यांचं रविवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.Jyoti Kalani died Ulhasnagar

उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचं निधन, मोदी लाटेतही राष्ट्रवादीकडून विजय
ज्योती कलानी
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 11:17 AM

ठाणे: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती पप्पू कलानी यांचं रविवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.ज्योती कलानी यांना त्यांच्या निवासस्थानी ह्रदयविकाराचा झटका आला , त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ज्योती कलानी 70 वर्षाच्या होत्या. ज्योती कलानी यांचा राजकीय प्रवास नगरसेवक, महापौर ते आमदार असा राहिला. ज्योती कलानी यांच्या निधनामुळे उल्हासनगर शहरावर शोककळा पसरली आहे. ज्योती कलानी 2014 मध्ये मोदी लाटेमध्येही निवडून आल्या होत्या. (Jyoti Kalani ex MLA of NCP died of heart attack at residence in Ulhasnagar)

ज्योती कलानी यांची आयर्न लेडी म्हणून ओळख

ज्योती कलानी यांची आयर्न लेडी, तसंच शहराची भाभी म्हणून त्यांची ओळख होती. सन 2014 ते 2019 या काळात त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगर विधानसभा क्षेत्राच्या आमदार होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या राष्ट्रवादीच्या उल्हासनगर जिल्हाध्यक्षा होत्या.

उल्हासनगरच्या पहिल्या महापौर

ज्योती कलानी अनेक वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. 1995 ला त्या उल्हासनगर नगरपरिषदेच्या पहिल्या नगराध्यक्षा होत्या. 2005 मध्ये उल्हासनगरमध्ये महापालिका स्थापन झाल्यानंतर प्रथम महापौर होण्याचा मान देखील त्यांना मिळाले होते. त्यानंतर त्या अनेकदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.

2014 मध्ये पहिल्यांदा आमदार

ज्योती कलानी यांचे पती पप्पू कलानी हे उल्हासनागरचे सलग ४ वेळा आमदार होते. एका हत्येच्या गुन्ह्यात पप्पू कलानी यांना तुरुंगात जावं लागलं. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं ज्योती कलानी यांना उमेदवारी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असूनही ज्योती कलानी यांनी भाजपच्या कुमार कलानी यांचा  पराभव केला होता. ज्योती कलानी यांचा मुलगा ओमी कलानी यांनी टीम ओमी कलानी नावाची राजकीय संघटना तयार केली आहे. उल्हासनागरच्या राजकारणात कलानी नावाला मोठं महत्व आहे. ज्योती कलानी यांच्या निधनामुळे उल्हासनगर शहरावर शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या:

आमदार ज्योती कलानींचा निवडणूक लढण्यास नकार, राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?

LIVE | उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन

(Jyoti Kalani ex MLA of NCP died of heart attack at residence in Ulhasnagar)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.