कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याच्या वकिलांना धमकी

कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या आणि हत्येच्या प्रकरणातील आरोपीचा वकील संजय धनके यांना सातत्याने धमक्या येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आधी बदलापूर आणि नंतर कल्याणच्या इतर प्रकरणांमध्येही आरोपींचे वकीलपत्र घेतल्यामुळे त्यांना धमकी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याच्या वकिलांना धमकी
कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याच्या वकिलांना धमकी
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 5:50 PM

कल्याणच्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याच्या वकिलांनी आपल्याला सातत्याने धमकी येत असल्याचा दावा केला आहे. आरोपी विशाल गवळीचा वकील संजय धनके यांनी हा दावा केला आहे. मला सातत्याने धमकी दिली जात आहे, असं वकील संजय धनके म्हणाले आहेत. वकील संजय धनके यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस काही कारवाई करतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय धनके यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून धमकी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच आपण कुणाची केस लढायची याबाबत आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे, असं वकील संजय धनके म्हणाले.

संजय धनके नेमकं काय म्हणाले?

“मी बदलापूर अल्पवीय मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं वकीलपत्र घेतलं तेव्हाही मला सामाजिक कार्यकर्त्यांनी धमकी दिल्या की, वकीलपत्र घ्यायचं नाही म्हणून. शेवटी संविधानाने सर्वांना समान अधिकार दिला आहे. जोपर्यंत आरोपीवर गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो निर्दोष असतो. असं नाही की कुणाला वकीलपत्र देता येत नाही किंवा घेता येत नाही. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. त्याप्रमाणे मी वकीलपत्र टाकलं. पण काही लोकांनी धमक्या दिल्या. अक्षय शिंदे याच्या बाबतीत दिल्या. अखिलेश शुक्ला यांच्या बाबतीतही दिल्या की, मराठी माणूस असून तू असं करतोय म्हणून. अक्षय शिंदे बरोबर चार माणसं मराठी होते हेही आपल्याला नाकारता येत नाही”, अशी भूमिका वकील संजय धनके यांनी मांडली.

हे सुद्धा वाचा

संजय धनके यांनी ‘या’ वादग्रस्त प्रकरणांत आरोपींचे वकीलपत्र घेतले

दरम्यान, वकील संजय धनके हे वादग्रस्त प्रकरणात आरोपींचे वकीलपत्र घेण्यासाठी आता प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं वकीलपत्र घेत केस लढली होती. त्यानंतर कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्ला याचं वकीलपत्र घेतलं होतं. त्यानंतर वकील संजय धनके यांनी आरोपी विशाल गवळी यांचं वकीलपत्र घेतलं आहे. एकीकडे आरोपी विशाल गवळी याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे वकील संजय धनके यांनी त्याचं वकीलपत्र घेतलं. त्यामुळे संतापलेल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांना धमकी दिली जात असल्याचा दावा संजय धनके यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.