टिटवाळा आरोपी मिरवणूक प्रकरण, पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या, चौकशी सुरु

मोक्का अंतर्गत शिक्षा भोगणारा आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

टिटवाळा आरोपी मिरवणूक प्रकरण, पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या, चौकशी सुरु
Kalyan-accused-procession
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 7:21 PM

ठाणे : मोक्का अंतर्गत शिक्षा भोगणारा आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्या या आरोपींची नावे गणेश म्हसकर, महेश पाल आणि मनिष म्हसकर असे असून त्यांची चौकशी सुरु आहे. (Kalyan Police arrested Three people who arranges procession of accused)

नेमका प्रकार काय ?

मोक्का अंतर्गत शिक्षा भोगणारा आरोपी गणेश म्हसकर हा तब्बल पाच वर्षांनी आधारवाडी कारागृहातून बाहेर आला होता. गुरुवारी त्याची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर आधारवाडी कारागृह ते वरप गाव अशी तब्बल पाच किलोमीटरपर्यंत गणेश म्हसकर याची मिरवणूक काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून टीका केली गेली. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर टिटवाळा पोलिसांनी 40 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार आज तिघांना ताब्यात घेतले. सध्या हे तिघेही टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरु आहे.

कल्याणमध्ये तिघांना बेदम मारहाण

दरम्यान, दुसरीकडे कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाने बेदम मारहाण केली. एका तरुणीने उल्हासनगरहून डोंबिवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्या रिक्षातून प्रवास करत असताना तो रिक्षाचालक तिची छेड काढू लागला. यानंतर त्या तरुणीने आपल्या दोन मित्रांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांना तातडीने संबंधित ठिकाणी येण्यास सांगितले. यानंतर तिचे दोन्ही मित्र पोहोचल्यानंतर त्यांचा रिक्षाचालकांशी वाद झाला. मात्र यावेळी इतर जमावाला त्या दोघांसह तरुणीला गावातील काही लोकांनी पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली.

इतर बातम्या :

मुंबईकरांकडून वसूल केलेले 21 लाख पोलिसानेच लाटले, 8 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या शिपायावर फसवणुकीचा गुन्हा

Video: लसीकरण केंद्रावर चालूपणा, संतापलेल्या राजन विचारेंनी शिवसैनिकाला मारला फटका, व्हिडीओ व्हायरल

रात्री गाढ झोपेत असताना अज्ञातांचा हल्ला, 21 वर्षीय तरुणाचा चिरला गळा, बीड हादरलं

(Kalyan Police arrested Three people who arranges procession of accused)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.