AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फटका चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, महिला प्रवाशांचे मोबाईल चोरायचा

खाली पडलेला मोबाईल उचलून पळून जाण्याच्या तयारीत चोरटा असतानाच फटका पॉईंटवर सध्या वेशात तैनात असलेल्या रेल्वे पोलिस शिपाई केदार यांनी त्याला पकडले. पकडले जाताच या चोरट्याने केदार यांच्या हाताचा चावा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या अवस्थेत देखील केदार यांनी त्याला पकडून ठेवले.

फटका चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, महिला प्रवाशांचे मोबाईल चोरायचा
फटका चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 9:59 PM

कल्याण : लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या हातावर काठीचा फटका मारत मोबाईल (Mobile) चोरणाऱ्या आरोपीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. पोलिसाच्या तावडीतून सुटण्यासाठी आरोपीने पोलिसाच्या हाताला चावा घेतला मात्र तरीही पोलिसांनी त्याला पकडलेच. कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान ही घटना घडली असून अजय अर्जुन कांबळे असे या चोरट्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या चोरट्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली. धावत्या लोकलमध्ये दरवाजात उभे राहू नका, मोबाईल पाहू नका, सतर्क रहा असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. (Kalyan Railway Police arrested a thief for stealing a mobile phone in a train)

मोबाईल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ

लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हाताला फटका मारत त्यांचा मोबाईल हिसकावण्याच्या घटना वाढत होत्या. पोलिस आयुक्त कैशर खालिद यांच्या आदेशानंतर कल्याण रेल्वेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी अशा घटना घडत असलेल्या फटका पॉईंटच्या ठिकाणी गस्त वाढवली होती. अंबरनाथमधील रहिवासी असलेले मनिष होटचंदानी सोमवारी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मोबाईल हातात पकडून ट्रेनच्या दरवाजात उभे राहून प्रवास करत होते. कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान ट्रक क्रॉस करत असल्यामुळे लोकलचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत ट्रॅकशेजारी उभ्या असलेल्या आरोपीने आपल्या हातातील लाकडी दांड्याचा फटका होटचंदानी यांच्या हातावर मारला, ज्यामुळे त्याच्या हातातील मोबाईल खाली पडला.

पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांना मुसक्या आवळल्या

खाली पडलेला मोबाईल उचलून पळून जाण्याच्या तयारीत चोरटा असतानाच फटका पॉईंटवर सध्या वेशात तैनात असलेल्या रेल्वे पोलिस शिपाई केदार यांनी त्याला पकडले. पकडले जाताच या चोरट्याने केदार यांच्या हाताचा चावा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या अवस्थेत देखील केदार यांनी त्याला पकडून ठेवले. या आरोपीच्या नावावर टिळकनगर पोलीस ठाण्यात 3 तर खडकपाडा पोलीस ठाण्यात 2 गुन्ह्याची नोंद असल्याचे रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शार्दुल वाल्मिक यांनी सांगितले. या आरोपीला रेल्वे न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Kalyan Railway Police arrested a thief for stealing a mobile phone in a train)

इतर बातम्या

Yavatmal Children Death : यवतमाळमध्ये काळीज चिरणारी घटना, भावाला झोका देत होती चिमुकली अन् सिमेंटचा खांब कोसळला

CCTV Video: दोन मित्र बोलत राहीले आणि वरुन मृत्यू कोसळला, एकाचा जागेवर जीव गेला, घटना कॅमेऱ्यात कैद

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.