काँग्रेसच्या बॅनरवर शिवसेनेचे नामांकीत नगरसेवक, विविध चर्चांना उधाण

कल्याणमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कधीही न घडलेल्या अशा घटना घडताना दिसत आहेत (kalyan shiv sena corporators photo on congress banner).

काँग्रेसच्या बॅनरवर शिवसेनेचे नामांकीत नगरसेवक, विविध चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 6:37 PM

कल्याण (ठाणे) : कल्याणमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कधीही न घडलेल्या अशा घटना घडताना दिसत आहेत. कल्याणच्या नेतीवली चौकात लावण्यात आलेल्या काँग्रेसच्या एका बॅनरवर थेट शिवसेनेचे मातब्बर आणि नामांकित अशा दोन नगरसेवकांचे फोटो झळकले आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. या बॅनरवर शिवेसना नगरसेवक मल्लेश शेट्टी आणि नविन गवळी यांचे फोटो झळकले आहेत (kalyan shiv sena corporators photo on congress banner).

बॅनरवर नेमकं आहे तरी काय?

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबादारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर नाना पटोले आज पहिल्यांदा कल्याणमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी येत आहेत. या कार्यक्रमानिमित्त त्यांचे कल्याण नगरीत स्वागत आहे, असा बॅनर लोकनेते नाना पटोले विचारमंचच्यावतीने लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी आणि नवीन गवळी यांचेही फोटो आहेत. हा बॅनर नेतीवली नाक्यावर लावण्यात आला आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मल्लेश शेट्टींचा वादग्रस्त बॅनर

शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी गेल्या आठवड्यात नेतीवली नाक्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देणारा बॅनर लावला होता. मात्र, या बॅनरमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना टोमणे मारण्यात आले होते. ‘खासदार दिलदार है, मगर चमचो से लोग परेशान’, असा मजूकर या बॅनरमध्ये होता. या बॅनरमुळे कल्याणमधील शिवसेनेचे अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. ‘टीव्ही 9 मराठी’ने याबाबत बातमी प्रदर्शित केल्यानंतर संबंधित वादग्रस्त बॅनर हटवून दुसरा शुभेच्छांचा बॅनर त्याठिकाणी लावण्यात आला होता.

कल्याणच्या नेतीवली चौकात दोघी बॅनर लावण्यात आले आहेत. नेतीवली चौकात मल्लेश शेट्टी यांचं ऑफिस आहे. विशेष म्हणजे या नेतीवली नाक्यावर मुंबई, नाशिक आणि पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या हजारो गाड्यांची रोजची वर्दळ असते. मुख्य चौक परिसरातच बॅनर असल्याने आतापर्यंत कित्येक लोकांनी हा बॅनर वाचला असेल.

संबंधित बातमी : खासदार दिलदार, लेकीन चमचों से लोग परेशान, मातब्बर शिवसेना नगरसेवकाच्या बॅनरमुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.