कल्याणमधील शिवसेनेचे ख्यातनाम नगरसेवक दीपेश म्हात्रे महापालिका आयुक्तांच्या भेटीला, दिव्यांगांसाठी महत्त्वपूर्ण मागणी

केडीएमसी हद्दीत कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय राज्यात आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे (Dipesh Mhatre demand car vaccination service for physical disabilities peoples)

कल्याणमधील शिवसेनेचे ख्यातनाम नगरसेवक दीपेश म्हात्रे महापालिका आयुक्तांच्या भेटीला, दिव्यांगांसाठी महत्त्वपूर्ण मागणी
केडीएमसी नगरसेवक दीपेश म्हात्रे
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 3:57 PM

कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय राज्यात आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी कोरोना प्रतिबंध लसीचं लसीकरण हाच एक रामबाण उपाय असल्याचं बोललं जात आहे. मात्र, लसींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अशात आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी देखील लसीकरण मोहिम सुरु करण्यात आलीय. सरकरी कर्मचाऱ्यांना आधी लसी देऊन झाल्या आहेत. तसेच इतर नागरिकही लसी घेतील. मात्र, दिव्यांगांचं काय? त्यामुळे दिव्यांग नागरिकांसाठी देखील कार व्हॅक्सिनेशन सुरु करा, अशी मागणी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली (Dipesh Mhatre demand car vaccination service for physical disabilities peoples).

दीपेश म्हात्रे नेमकं काय म्हणाले?

दीपेश म्हात्रे यांनी आज महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिव्यांग्यांच्या व्यथा मांडल्या. तसेच दिव्यांग हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत जाऊन लस घेणे हे जिकरीचे असते. ज्यांच्या घरी काळजी घेणारे कोणी नसते त्यांना केंद्रावर जाऊन लस घेता येत नाही. त्यांच्यासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर कार व्हॅक्सीनेशन सुरु करण्यात यावे, अशी मागणी दीपेश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त सूर्यवंशी यांच्याकडे केली.

आयुक्तांचं आश्वासन

आयुक्तांनी म्हात्रे यांची मागणी मान्य केली आहे. मात्र सध्या लसीचे पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने येत्या आठवडाभरात लसीचे डोस उपलब्ध होताच कार व्हॅक्सीनेशन सुरु केले जाईल, असं आश्वासन दिलं (Dipesh Mhatre demand car vaccination service for physical disabilities peoples).

‘केंद्र सरकारची लसीकरणाची गाईडलाईन्स चुकीची’

“1 मे पासून राज्यातील 18 ते 45 वयोगटातील नागरीकांसाठी लसीकरण सुरु केले आहे. मात्र केंद्र सरकारची ही त्यासाठी असलेली गाईडलाईन्स चुकीची आहे. पहिला डोस 30 टक्के व दुसरा डोस 70 टक्के नागरीका दिला जाईल असे सूचित केले गेले आहे. त्यामुळे पहिल्या डोसपासून पुन्हा 18 ते 45 वयोगटातील नागरीक वंचित राहू शकतात. त्यामुळे केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात राज्याला लसींचा साठा उपलब्ध करुन द्यावा”, अशी मागणी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.

मुंबईत देशातील पहिलं कार व्हॅक्सिनेशन सेंटर

वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे कोरोना लसीकरण सुलभ व्हावे, या हेतूने मुंबई महानगरपालिकेच्या वतीने परिसरात देशातील सर्वांत पहिले ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. दादरच्या कोहिनूर स्क्वेअरच्या पार्किंग लॉटमध्ये सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे लोकार्पण खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील कोरोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दिव्यांग नागरिक आणि वरिष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचून लस घेणे जिकीरीचे ठरत आहे. यावर उपाय म्हणून पालिकेच्या वतीने ड्राईव्ह इन कोरोना लसीकरण केंद्राची संकल्पना मांडण्यात आली. दादरच्या या केंद्रातील ड्राईव्ह इन सुविधेचा लाभ दिवसाला सुमारे 250 गाड्यांमधील नागरिक घेऊ शकतात. आता याठिकाणी केवळ 45 वर्षांवरील आणि दिव्यांग नागरिकांसाठीच ही सुविधा उपलब्ध असून लवकरच 18 वर्षांवरील सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा मानस आहे. कोहिनुर पार्किंग लॉट मधील या केंद्रात ड्राईव्ह इन लसीकरण सुविधे व्यतिरिक्त असलेल्या 7 बूथच्या माध्यमातून दिवसाला 4 हजार नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : टोकण घेऊन सहा तास रांगेत, लसीसाठी नंबर आलाच नाही, कल्याणच्या लसीकरण केंद्रावर संतप्त नागरिकांचा राडा

माणुसकी मेली, एकीकडे आपलं माणूस गमावल्याचं दु:ख, दुसरीकडे खासगी रुग्णावाहिका चालकांकडून लुटमार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.