हिरव्या युतीसोबत लोटांगण घातल्याने ही परिस्थिती, भाजप नेते किरीट सोमय्या यांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी हिरव्या युतीसोबत लोटांगण घातले आहे. याला काय भगवी युती आणि संस्कृती म्हणतात का ? रजा अकादमीचे लोक बाहेर आहेत. ज्यांनी अफवा पसरविली त्यांना जेलमध्ये का टाकले जात नाहीस असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केलाय. ते कल्याणमध्ये बोलत होते.

हिरव्या युतीसोबत लोटांगण घातल्याने ही परिस्थिती, भाजप नेते किरीट सोमय्या यांची उद्धव ठाकरेंवर टीका
किरीट सोमय्या, भाजप नेते
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 10:04 PM

ठाणे : राज्यभरात ठिकठिकाणी त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद उमटले आहे आहेत. अमरावती, मालेगाव, नांदेड अशा शहरात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकार तसेच शिवसेनेले लक्ष्य केलंय. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी हिरव्या युतीसोबत लोटांगण घातले आहे. याला काय भगवी युती आणि संस्कृती म्हणतात का ? रजा अकादमीचे लोक बाहेर आहेत. ज्यांनी अफवा पसरविली त्यांना जेलमध्ये का टाकले जात नाही, असा सवाल सोमय्या यांनी केलाय. ते कल्याणमध्ये बोलत होते.

किरीट सोमय्या काय म्हणाले ?

त्रिपुरा राज्यात मिशीद जाळल्याच्या कथित घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. नांदेड, अमरावती, तसेच मालेगाव अशा शहरात मुस्लीम बांधवांनी मोठे मोर्चे काढले. या मोर्चाला काही ठिकाणी गालबोट लागले. त्यानंतर आजदेखील अमरावती शहर धुसमत राहिले. भाजपने पुकारलेल्या बंददरम्यान जाळपोळ दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला लक्ष्य केलंय. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हिरव्या युतीसोबत जे लोटांगण घातले आहे, त्यामुळेच आज महाराष्ट्रात अशा प्रकारची अवस्था उभी राहिली आहे. रजा अकादमीचे लोक बाहेर आहेत. ज्यांनी अफवा पसरविली त्यांना जेलमध्ये का टाकले जात नाही, असे सोमय्या म्हणाले.

सरकारने एसटी संपाची चेष्टा करु नये, मागणी सरकारने मान्य करावी

तसेच पुढे बोलताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरदेखील भाष्य केलं. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आंदोलनाचा सहावा दिवस आहे. अनेक कामगारांवर कामावर हजर न झाल्याने डेपो प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तरीदेखील एसटी कर्मचारी राज्य सरकारमध्ये महामंडळ विलीन करण्याच्या आंदोलनावर ठाम आहे. कल्याणमधील एसटी एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाटी भाजप नेते किरीट सोमय्या, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे आदी कार्यकर्ते कल्याण बस डेपोत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना “सरकारने एसटी संपाची चेष्टा करु नये. संपाला जिद्दाचा प्रश्न करु नये. कामगारांच्या मागणी सरकारने मान्य करावी, असे वक्तव्य केले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचेदेखील सोमय्या म्हणाले.

इतर बातम्या :

Milind Teltumbde | पोलिसांच्या धुमश्चक्रीत मिलिंद तेलतुंबडे ठार?; गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात मोठे कोम्बिंग ऑपरेशन

Amravati Violence : अमरावती हिंसाचारानं हादरली, पालकमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, बैठकीत शांततेसाठी मंथन होणार

एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा ! महाराष्ट्रात 22 तर तेलंगणात 50 हजार पगार, सरकार मागण्या मान्य करणार ?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.