AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernath Mahadarshan : एमटीडीसीच्या ‘महादर्शन’ उपक्रमाची सुरुवात, महादर्शन उपक्रमांतर्गत अंबरनाथच्या शिवमंदिराचं दर्शन

या उपक्रमामध्ये मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर, अंबरनाथचं तब्बल 1060 वर्ष जुनं प्राचीन शिवमंदिर आणि टिटवाळ्याचं महागणपती मंदिर ही 3 मंदिरं पर्यटकांना दाखवली जातील. सोबतच या 3 मंदिराचा इतिहास, माहिती सुद्धा पर्यटकांना दिली जाईल. मुंबईत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सिद्धिविनायक मंदिरातून या उपक्रमाची सुरुवात झाली. यानंतर अंबरनाथच्या शिवमंदिरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या उपक्रमाचं स्वागत केलं.

Ambernath Mahadarshan : एमटीडीसीच्या 'महादर्शन' उपक्रमाची सुरुवात, महादर्शन उपक्रमांतर्गत अंबरनाथच्या शिवमंदिराचं दर्शन
एमटीडीसीच्या 'महादर्शन' उपक्रमाची सुरुवातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 11:41 PM

अंबरनाथ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं मुंबईलगतच्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेण्यासाठी ‘महादर्शन‘ (Mahadarshan) ही विशेष बससेवा (Bus Service) सुरू करण्यात आली आहे. अभिनेता मिलिंद गुणाजी आणि दलीप ताहील यांच्या उपस्थितीत रविवारी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुंबई शहर फिरण्यासाठी आलेले पर्यटक (Tourist) मुंबई दर्शन करण्यास प्राधान्य देत असतात. याच पर्यटकांना मुंबई शहर आणि उपनगरातली काही प्रमुख मंदिरं एका दिवसात फिरता यावीत आणि त्यामाध्यमातून ही मंदिरं देशात आणि जगात माहिती व्हावीत, त्यांचा इतिहास सर्वांना कळावा या उद्देशानं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महादर्शन हा उपक्रम सुरू केला आहे.

तीन मंदिरं पर्यटकांना दाखवली जाणार

या उपक्रमामध्ये मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर, अंबरनाथचं तब्बल 1060 वर्ष जुनं प्राचीन शिवमंदिर आणि टिटवाळ्याचं महागणपती मंदिर ही 3 मंदिरं पर्यटकांना दाखवली जातील. सोबतच या 3 मंदिराचा इतिहास, माहिती सुद्धा पर्यटकांना दिली जाईल. मुंबईत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सिद्धिविनायक मंदिरातून या उपक्रमाची सुरुवात झाली. यानंतर अंबरनाथच्या शिवमंदिरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या उपक्रमाचं स्वागत केलं. यावेळी अभिनेते मिलिंद गुणाजी आणि दलीप ताहील हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी सर्वांना शिवमंदिराविषयी माहिती देण्यात आली. आपापल्या परिसरापुरती प्रसिद्ध असलेली ही मंदिरं जगाच्या नकाशावर येण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचं यावेळी अभिनेते मिलिंद गुणाजी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

अंबरनाथमध्ये 150 मंदिरांना पूजा साहित्य प्रदान

शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त अंबरनाथमध्ये तब्बल 150 मंदिरांना धार्मिक आणि पूजेचे साहित्य प्रदान करण्यात आलं. शिवसेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वतीनं हे साहित्य प्रदान करण्यात आलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्त्व हेच राष्ट्रीयतत्व हा संदेश दिला होता. याच अनुषंगाने आजवर अंबरनाथमध्ये शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी 22 हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. तर शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील आणि तालुक्यातील तब्बल 150 मंदिरांना शिवसेनेच्या वतीनं धार्मिक आणि पुजासाहित्य प्रदान करण्यात आलं. यामध्ये चौरंग, पाट, होमकुंड, कलश, समई, पंचारती अशा मंदिरात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचा समावेश होता. (Launch of Mahadarshan initiative on behalf of Maharashtra Tourism Development Corporation)

हे सुद्धा वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक.
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?.
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर.
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन.
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?.
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन.
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष.
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल.
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं....