सरसकट लॉकडाऊन नाही, अफवांना बळी पडू नका; ठाणे महापालिकेचं ठाणेकरांना आवाहन
ठाण्यात कोणत्याही प्रकारचा सरसकट लॉकडाऊन करण्यात आलेला नाही. (Limited lockdown in 16 Thane hotspots )
ठाणे: ठाण्यात कोणत्याही प्रकारचा सरसकट लॉकडाऊन करण्यात आलेला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवाना बळू पडू नका, असं आवाहन करतानाच केवळ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असणाऱ्या ठिकाणीच निर्बंध घालण्यात आले आहेत, असं ठाणे महापालिकेने म्हटलं आहे. (Limited lockdown in 16 Thane hotspots )
प्रतिबंधित क्षेत्रातच निर्बंध
सध्या महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाय योजना करण्यात येत आहेत. ज्या परिसरात कोरोनाचा संसर्ग जास्त आहे त्या परिसरात हॅाटस्पॅाटची निर्मिती करण्यात आली आहे. या हॅाटस्पॅाट क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कोविडचे रुग्ण सापडले आहेत, त्या ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्येच निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग आहे ती इमारत, त्या इमारतीमधील मजला तिथेच 31 मार्च 2021 पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. ऊर्वरित ठिकाणचे सर्व व्यवहार यापूर्वी जसे सुरू होते, त्यानुसार सुरू राहतील, असं पालिकेने स्पष्ट केलं आहे.
अस्थापना सुरू राहणार
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आला नसून ज्या आस्थापना सुरु आहेत त्या आस्थापना यापुढेही सुरु राहणार आहेत. तरी ठाणेकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहनही पालिकेने केलं आहे.
ठाण्यात 16 ठिकाण कोरोना हॉटस्पॉट
ठाणे शहरात अनलॉकनंतर सर्वकाही आलबेल झाले असतानाच कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली. सध्या ठाण्यात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.अशाच प्रमाणात रुग्णांचा संसर्ग वाढत गेला तर आगामी काळात कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रात 16 ठिकाणं कोरोना हॉटस्पॉट (प्रतिबंधित क्षेत्र ) निश्चित केली आहेत. त्यामुळे आता कोरोनाला अटकाव करण्यासाठी या 16 हॉटस्पॉटमध्ये येत्या 31 मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाऊन असेल. अशी माहिती ठाण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली
राज्यात कोरोनाची स्थिती
राज्यात गेल्या दोन दिवसात 20 हजारांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. काल (8 मार्च) 8 हजार 744 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 97 हजार 638 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यातील मृत्यूदर हा 2.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रविवारी 7 मार्चला 11 हजार 141 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला होता. (Limited lockdown in 16 Thane hotspots )
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 9 March 2021https://t.co/FBEwWyuboQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2021
संबंधित बातम्या:
Mumbai Lockdown news | तर मुंबईत अंशत: लॉकडाऊन, पालकमंत्र्यांचा इशारा
महाराष्ट्रातील तीन शहरं लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, तुमच्या शहरातील कोरोना स्थिती काय?
(Limited lockdown in 16 Thane hotspots )