Thane Winner Candidate List : ठाण्यातल्या 18 जागांचा निकाल एका क्लिकवर, बघा तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं?

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 : महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यात ठाण्यात 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. यंदा ठाण्यातील निवडणुका खूप इंटरेस्टिंग आहेत. ठाण्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुक्ता आहे. ठाण्यातील विजयी उमेदवारांची यादी तुम्ही एका क्लिकवर पाहू शकता.

Thane Winner Candidate List : ठाण्यातल्या 18 जागांचा निकाल एका क्लिकवर, बघा तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं?
Thane Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 2:56 PM

आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. ठाणे जिल्ह्याच्या निकालाकडे सगळ्या राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. कारण महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातून येतात. महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघांपैकी ठाणे जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. मुंबईला लागून असलेला ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पूर्वी शिवसेना एकसंध असताना ठाण्यावर शिवसेनेचं वर्चस्व होतं. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशी मुख्य लढत आहे. ठाणेकर कोणाला आपली पसंती देतात याकडे सगळ्यांच लक्ष असेल.

लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच वर्चस्व दिसून आलं होतं. त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडून आला. ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नरेश म्हस्के निवडून आले. नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे गटाच्या राजन विचारे यांचा पराभव केला. शिवसेनेत फूट पडली, तेव्हा ठाण्यातील शिवसेनेचे सर्व नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत उभे राहिले. अपवाद फक्त राजन विचारे यांचा. राजन विचारे हे उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. पण लोकसभेला एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. राजन विचारे यांचा जवळपास 2 लाख मतांनी पराभव झाला. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून आता ते पुन्हा निवडणूक लढवत आहेत.

विधानसभा मतदारसंघविजयी उमेदवाराचे नाव पक्ष
कोपरी पाचपाखडीएकनाथ शिंदे विजयीशिवसेना
ठाणेसंजय केळकर विजयी भाजप
मुंब्रा कळवाजितेंद्र आव्हाड विजयीशरद पवार गट
ओवळा माजीवाडाप्रतास सरनाईक विजयीशिवसेना
मीरा भाईंदरनरेंद्र मेहता विजयी भाजप
कल्याण ग्रामीणराजेश मोरे विजयीशिवसेना
डोंबिवलीरवींद्र चव्हाण विजयी भाजप
ऐरोलीगणेश नाईक विजयीभाजप
बेलापूर
कल्याण पूर्वसुलभा गायकवाड विजयीभाजप
उल्हासनगरकुमार अयलानी विजयीभाजप
अंबरनाथबालाजी किणीकर विजयी शिवसेना
मुरबाडकिसान कथोरे विजयीभाजप
कल्याण पश्चिमविश्वनाथ भोईर विजयी शिवसेना
भिवंडी पूर्वरईस शेख विजयीसमाजवादी पार्टी
भिवंडी पश्चिमप्रभाकर चौगुले विजयीभाजप
शहापूरदौलत दरोडा विजयी राष्ट्रवादी काँग्रस पार्टी
भिवंडी ग्रामीणशांताराम मोरे विजयी शिवसेना
ठाण्यातील प्रतिष्ठेच्या लढती

ठाण्याातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडीतून उभे आहेत. एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडीमधून सलग चारवेळा आमदार म्हणून निवडून विधानसभेत गेले आहेत. आता स्वत: मुख्यमंत्री असल्याने ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. यात कळवा-मुंब्राच्या निकालावर सुद्धा लक्ष असेल. कळवा-मुंब्रामधून शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड उभे आहेत. ते महायुतीवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. ऐरोलीच्या निकालाकडेही लक्ष असेल. इथून भाजपचे दिग्गज नेते गणेश नाईक रिंगणात आहेत. त्यांचे पुत्र संदीप नाईक हे शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.