पप्पू कलानींच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढली, महिन्याभरात जयंत पाटील दुसऱ्यांदा भेटीला!

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे काल लोकल प्रवास करुन उल्हासनगरात आले. त्यांनी काल 'कलानी महल'वर जाऊन माजी आमदार पप्पू कलानी यांची भेट घेतली. महिन्याभरात दुसऱ्यांदा जयंत पाटील यांनी पप्पू कलानी यांची भेट घेतली.

पप्पू कलानींच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढली, महिन्याभरात जयंत पाटील दुसऱ्यांदा भेटीला!
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 8:04 AM

उल्हासनगर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे काल लोकल प्रवास करुन उल्हासनगरात आले. त्यांनी काल ‘कलानी महल’वर जाऊन माजी आमदार पप्पू कलानी यांची भेट घेतली. महिन्याभरात दुसऱ्यांदा जयंत पाटील यांनी पप्पू कलानी यांची भेट घेतली.

उल्हासनगरात राजकीय गणितं बदलली, पप्पू कलानींच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढली

माजी आमदार पप्पू कलानी हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर उल्हासनगरात राजकीय गणितं बदलली आहेत. भाजपच्या सोबत असलेल्या कलानी गटानं काही दिवसांपूर्वीच ३२ नगरसेवकांसह राष्ट्रवादीत घरवापसी केली. यानंतर जयंत पाटील हे महिन्याभरात दुसऱ्यांदा ‘कलानी महल’ या पप्पू कलानी यांच्या निवासस्थानी आले आणि त्यांनी पप्पू कलानी, तसंच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या नगरसेवकांची भेट घेतली.

यावेळी जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या नवीन एलईडी घड्याळाचं अनावरण करण्यात आलं. ही घड्याळं शहरात सुमारे २५० ठिकाणी बसवली जाणार आहेत. यावेळी कलानी परिवाराच्या येण्यानं राष्ट्रवादीची ताकद उल्हासनगरात वाढल्याचं जयंत पाटील यांनी नमूद केलं.

22 नगरसेवकांनी हातावर ‘घड्याळ’ बांधलं

टीम कलानींच्या 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश झाला. 27 ऑक्टोबर रोजी टीम कलानीने राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधलं.

पंचम कलानी या तांत्रिकदृष्ट्या भाजपच्या चिन्हावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. आता राष्ट्रवादी प्रवेशापूर्वी पंचम कलानी यांनी उल्हासनगरचे महापालिका आयुक्त राजा दयानिधी यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. टीम ओमी कलानीच्या भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या 22 नगरसेवकांनी हातावर ‘घड्याळ’ बांधले आहे.

कलानींच्या पक्षप्रवेशाने उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली

कलानी यांच्या पक्षप्रवेशानंतर उल्हासनगर महापालिकेवर आता राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. कलानी परिवाराच्या प्रवेशामुळे शहरात पक्षाला बळ मिळेल, असंही आव्हाड म्हणाले. कलानी गटाचे 22 आणि इतर 10 अशा 32 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे.

भाजपसाठी मोठा हादरा

आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी मोठा हादरा मानला जात आहे. मागील निवडणुकीत हे 22 नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

टीम कलानींचं महाविकास आघाडीला मतदान

उल्हासनगर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती निवडणुकीत भाजपच्या (टीम ओमी कलानीच्या) सात नगरसेवकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं होतं. त्यामुळे भाजपला सर्व समित्या गमवाव्या लागल्या होत्या. टीम ओमी कलानीच्या 9 नगरसेवकांनी महाविकास आघाडीला मतदान करत शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांना महापौर म्हणून निवडून आणलं. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. हे नगरसेवक टीम ओमी कलानीचे असले, तरी ते भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले असल्यानं तांत्रिकदृष्ट्या ते भाजपचे होते. त्यामुळे त्या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करत भाजप जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी यांनी याचिका दाखल केली होती.

हे ही वाचा :

उल्हासनगरात राजकीय भूकंप, पप्पू कलानींच्या सुनेसह 22 नगरसेवकांच्या हाती ‘घड्याळ’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.