महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डिस्चार्ज कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात जखमी झालेले शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महेश गायकवाड यांची प्रकृती आता सुधारली असून उद्या त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डिस्चार्ज कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 9:54 PM

गणेश थोरात, Tv9 प्रतिनिधी, ठाणे | 15 फेब्रुवारी 2024 : भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात जखमी झालेले शिवसेनेचे कल्याण विभाग शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांना तब्बल 14 दिवसांनंतर उद्या ज्युपिटर रुग्णालयातून दुपारनंतर डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी शुक्रवार 2 फेब्रुवारीला महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर जमिनीच्या वादावरून गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे दोघांना तातडीने उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन महेश गायकवाड यांच्या शरीरातून 6 गोळ्या तर राहुल पाटील यांच्या शरीरातून 2 गोळ्या काढल्या होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती बरी असल्याची माहिती समोर येत होती. अखेर त्यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.

महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना ज्युपिटर रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर दोघांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने ठाणे आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणाहून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा आणि सुव्यवस्था बघता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील असणार आहे. दोघांना त्यांचे चाहते आणि शिवसैनिक भेटण्यासाठी जागोजागी एकच गर्दी करणार आहेत.

या गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी उल्हासनगर चोपडा कोर्टाकडून देण्यात आलेली आहे. सध्या सर्व आरोपींना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. या प्रकरणामुळे येणाऱ्या काळात कल्याण-डोंबिवली मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या उपचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदेंसह इतर नेते मंडळींनी देखील भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.