सख्खा भाऊ पक्का वैरी, प्रॉपर्टीच्या वादातून आईला शिवीगाळ, भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉड टाकून हत्या

उल्हासनगरात मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावाने भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे (Man killed his brother over dispute on property in Ulhasnagar).

सख्खा भाऊ पक्का वैरी, प्रॉपर्टीच्या वादातून आईला शिवीगाळ, भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉड टाकून हत्या
मृतक विठ्ठल कदम यांचा फोटो
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 7:46 PM

उल्हासनगर (ठाणे) : उल्हासनगरात मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावाने भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सख्खा भाऊ संपत्तीच्या वादातून इतक्या टोकाचा निर्णय कसा घेऊन शकतो? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना सतावत आहे (Man killed his brother over dispute on property in Ulhasnagar).

नेमकं काय घडलं?

संतोष कदम असं या घटनेतील मारेकरी भावाचं, तर विठ्ठल कदम असं मृत्यू झालेल्या भावाचं नाव आहे. या दोघांच्या आईचं उल्हासनगरमध्ये घर आहे. या घराच्या वाटणीवरून संतोष आणि त्याच्या आईमध्ये वाद झाला. यावेळी संतोष हा दारू पिऊन आईला शिवीगाळ करत असल्याने तिने विठ्ठल या आपल्या दुसऱ्या मुलाला घरी बोलावून घेतलं.

आधी धमकी, नंतर हत्या

मात्र विठ्ठल तिथे येताच संतोष याचा पारा आणखी चढला. त्याने हे घर माझं असल्याचं सांगत विठ्ठलला तिथून निघून जायला सांगितलं. मात्र विठ्ठल याने संतोषला तिथून पिटाळून लावलं. त्यामुळे संतोषने विठ्ठलला बघून घेण्याची धमकी दिली. यानंतर काही वेळातच विठ्ठल हा कॅम्प 1 भागातील भीमनगर परिसरात उभा असताना संतोष याने तिथे येत लोखंडी रॉडने विठ्ठलवर हल्ला केला. या हल्ल्यात विठ्ठल याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांकडून आरोपीला बेड्या

या घटनेनंतर पोलिसांनी काही वेळातच संतोष याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे करतायत. मात्र या प्रकरणात पोलिसांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय (Man killed his brother over dispute on property in Ulhasnagar). या प्रकरणावर डीसीपी प्रशांत मोहिते यांनी प्रतिक्रिया दिली.

पोलिसांची प्रतिक्रिया

“उल्हासनगर पोलीस ठाणे हद्दीत भीमनगर येथे आरोपी संतोष कदम याने काल रात्री स्वत:च्या भावावर लोखंडी रॉड टाकून हत्या केली. संबंधित घटना रात्री अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं. घटनेनंतर अवघ्या काही तासात आरोपीला भिवंडी येथून पकडण्यात आलं”, असं डीसीपी प्रशांत मोहिते यांनी सांगितलं.

“आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन भावांमध्ये घराच्या वाटणीवरुन वाद होता. या वादतूनच आरोपी आईला मारहाण करायचा. याच वादातून आरोपीने भावाची हत्या केली”, असं प्रशांत मोहिते म्हणाले.

संबंधित बातम्या :

इंटरनेटवर हत्या करण्याची पद्धत सर्च, दुसऱ्या पत्नीला जीवे मारलं, विरारमध्ये तरुणाला अटक

आमदार आण्णा बनसोडेंच्या मुलासह 4 आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी, आतापर्यंत 13 आरोपींना अटक

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.