सीसीटीव्हीच्या सहाय्याने तासाभरात शोधली रिक्षा, त्या महिलेचे दागिने मानपाडा पोलिसांनी परत केले
घरी गेल्यानंतर त्यांना 7 तोळे दागिने रिक्षात राहिल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत रिक्षा चालक निघून गेला होता. गायकवाड यांच्याकडे रिक्षाचा नंम्बर नव्हता त्यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.
डोंबिवली : महिलेची रिक्षात राहिलेली दागिन्यांची बॅग पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तासाभरात शोधून महिलेच्या ताब्यात दिली. रिक्षाचा नंबर नसतानाही अवघ्या तासाभरात पोलिसांनी दागिने शोधून परत केल्याने महिलेने मानपाडा पोलिसाचे आभार मानले.
सीसीटीव्हीच्या सहाय्याने तासाभरात शोधले दागिने
सदर महिला कुटुंबासमवेत एका लग्न समारंभाला गेली होती. तेथून घरी परतण्यासाठी सदर कुटुंबाने रिक्षा केली. घराजवळ पोहोचताच सर्व जण रिक्षातून उतरुन घरी परतले. मात्र दागिन्यांची बॅग रिक्षातच विसरले. घरी गेल्यानंतर त्यांच्या बॅग रिक्षात राहिल्याचे लक्षात आले. मात्र त्यांना रिक्षाचा नंबर माहित नव्हता. महिलेच्या कुटुंबाने तात्काळ मानपाडा पोलीस ठाणे गाठले. मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या रिक्षाचा शोध घेतला आणि महिलेचे सात तोळ्याचे दागिने परत दिले.
काय घडले नेमके?
डोंबिवली पूर्वेत दावडी परिसरात राहणाऱ्या शोभा गायकवाड यांच्या मुलीच्या मैत्रिणीचे काल दादर येथे लग्न होते. या लग्नासाठी सर्व कुटुंबीय दादरला गेले होते. लग्न समारंभ आटोपून रात्री 9च्या सुमारास गायकवाड कुटुंबीय डोंबिवली रेल्वे स्थानकावर पोहचले. तेथून दावडी येथे घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्यांना दावडी येथे सोडून रिक्षा चालक तेथून निघून गेला. घरी गेल्यानंतर त्यांना 7 तोळे दागिने रिक्षात राहिल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत रिक्षा चालक निघून गेला होता. गायकवाड यांच्याकडे रिक्षाचा नंम्बर नव्हता त्यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे यांच्या पथकाने तपास सुरू केला. केडीएमसीचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. या सीसीटीव्हीत ती रिक्षा आढळून आली. रिक्षाच्या व्ह्यूडवर पांढऱ्या रंगाची पट्टी होती. त्या पट्टीच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला आधी रिक्षा चालकाने मला याबाबत काहीही माहित नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दागिने परत केले. आज पोलिसांनी गायकवाड यांना त्यांचे दागिने परत केले. (Manpada police return woman’s jewelery found within an hour with the help of CCTV)
इतर बातम्या
विद्यार्थिनीवर जीव जडला, नकारामुळे शिक्षकाकडून हत्या, नंतर मालगाडीसमोर उडी मारत आयुष्य संपवलं