मोठी बातमी! भिवंडीत अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके

भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याची माहिती आहे. सरवली पाडा, टेमघर पाडा, सोनाळे, भादवड इत्यादी गावात दोन ते तीन सेकंद कंपन जाणवले, अशी माहिती मिळत आहे.

मोठी बातमी! भिवंडीत अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके
भिवंडीत अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 9:29 PM

भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याची माहिती आहे. सरवली पाडा, टेमघर पाडा, सोनाळे, भादवड इत्यादी गावात दोन ते तीन सेकंद कंपन जाणवले, अशी माहिती मिळत आहे. जमीन हादरल्याचे झटके जाणवल्याने गावातील नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. कंपन नक्की कशाचे होते हे अजून स्पष्ट नसल्याची माहिती तहसीलदार अभिजित खोल यांनी दिली आहे. याबाबत हैदराबाद येथे रिपोर्ट पाठवून माहिती घेणार, असं तहसीलदरांनी सांगितलं आहे. संबंधित गावात महसूल प्रशासनाचे कर्मचारी दाखल झाले आहेत.

विशेष म्हणजे फक्त भिवंडीच नाही तर गुजरातच्या सौराष्ट्र क्षेत्रातही आज संध्याकाळी भूकंपाचे झटक जाणवले आहेत. आयएसआरच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी होती. दरम्यान, तिथल्या गिर सोमनाथ जिल्हा प्रशासनाकडे भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जैविक किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप आलेली नाही. आयएसआरच्या अंदाजानुसार, संध्याकाळी 6.08 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

हे सुद्धा वाचा

गुजरातच्या भूकंपाचे केंद्र गिर सोमनाथ जिल्हायातील तलाला परिसराजवळ 2 किमी अंतरावर होतं. विशेष म्हणजे जपान देश देखील भूकंपाने हादरला आहे. जपानच्या इशिकावा प्रांतात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी होती, अशी माहिती समोर येत आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.