गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी हालचाली वाढल्या, मंत्री शंभूराज देसाई आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून वेगाने तपास सुरु आहे. मंत्री शंभूराज देसाई आज ठाण्यात दाखल झाले. त्यांनी शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांची ठाण्यात शासकीय विश्रामगृहात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी हालचाली वाढल्या, मंत्री शंभूराज देसाई आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 7:48 PM

मुंबई | 4 फेब्रुवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज ठाण्याच्या ज्युपिटर हॉसिप्टल येथे जावून माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस केली. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन गोळ्या काढण्यात आल्या आहेत. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई आज त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ज्युपिटर हॉस्पिटलला गेले. त्यानंतर त्यांनी गोळीबार प्रकरणाचा तपास कुठपर्यंत झाला याबाबत आढावा घेतला. त्यांची या प्रकरणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.

महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर शंभूराज देसाई ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पोहोचले. यावेळी ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी विश्रामगृहात देसाई यांच्या भेटीला गेले. गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरु आहे. तपास अधिकारी तसेच इतर वरिष्ठ अधिकारीही देसाई यांच्या भेटीसाठी विश्रामगृहात गेले. यावेळी शंभूराज देसाई यांनी याप्रकरणावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

‘मी ठाण्याचा पालकमंत्री, पण गायकवाड यांनी नाराजी सांगितली नाही’

“महेश गायकवाड यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांच्याशी बोलू नका, असं सांगितलं. त्यामुळे मी त्यांना फक्त पाहिलं. गणपत गायकवाड यांनी आतापर्यंतच्या कुठल्याही बैठकीला स्वतःची नाराजी सांगितली नाही. मी ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. अनेक बैठका घेतल्या. तिथे गणपत गायकवाड होते. त्यांनी काहीही बोलून दाखवलं नाही. घटना घडल्यानंतर आता थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केले जातायत हे सर्व आरोप निराधार आणि चुकीचे आहेत. पोलिसांनी कायदेशीर कारवाईला सुरुवात केलेली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही योग्य कारवाई होईल, असं आश्वासन दिलंय. कायद्यानुसार पोलीस त्यांचं काम करतील”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरुन भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधलाय. त्यावर संभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी ही विकासासाठी आहे. विमासकामांसाठी आहे. तिथे याबाबतीत त्यांच्या गॅरंटीला जोडण्याचं काही गरज नाही. कायद्यानुसार योग्य ते पाऊल पोलीस उचलतील. उद्धव ठाकरे यांच्या सर्वच आरोपांवर बोलण्याची काही आवश्यकता नाही. महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.