लोकांची पाण्याची गरज महत्त्वाची की, राजकारण?, शिवसेना-भाजपाच्या माजी आमदारांमध्ये जुंपली

सूर्या प्रकल्पाच पाणी साठविण्यासाठी चेना येथे डोंगरावर पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरु आहे. त्यावरुन शिवेसना-भाजपाच्या माजी आमदारामध्ये जुंपली आहे. हे दोन्ही पक्ष राज्यात सत्तेवर आहेत. स्थानिक पातळीवर मात्र जोरात राजकारण सुरु आहे.

लोकांची पाण्याची गरज महत्त्वाची की, राजकारण?, शिवसेना-भाजपाच्या माजी आमदारांमध्ये जुंपली
Pratap sarnaik
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 10:27 AM

मीरा-भाईंदर : सध्या राज्यात शिवसेना-भाजपा महायुती सत्तेवर आहे. सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, असं चित्र दाखवलं जातं. असा संदेश बाहेर जाऊ नये, म्हणून दोन्ही पक्षांकडून वरिष्ठ स्तरावर खबरदारी घेतली जाते. पण स्थानिक पातळीवर मात्र चित्र वेगळं आहे. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींमध्ये मात्र तितकी सहजता नाहीय. त्यांच्यात स्पर्धा आणि आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. सध्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यात जुंपली आहे. सूर्या प्रकल्पाच्या पाणी साठवण्यावरुन हा सर्व वाद आहे. सूर्या प्रकल्पाच पाणी साठविण्यासाठी चेना येथे डोंगरावर पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरु आहे. मागच्या 2 महिन्यापासून हे काम बंद आहे. त्यावरुन प्रताप सरनाईक आणि नेरंद्र मेहता यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

“मागच्या 2 महिन्यापासून शहरातील एका राजकीय नेत्याने त्याच्या खासगी जागेतून रस्ता बंद केल्याने टाकीच्या बांधकामासाठी साहित्य व वाहने येणे बंद झाले होते व त्यामुळे काम थांबले होते” असं प्रताप सरनाईक म्हणाले. “पाण्याचं टाकीचा जे काम चालू आहे. टाकीच बांधकाम करत असताना किंवा बांधकामचे मटेरियल येत असताना समोरच्या जे सेवन इलेव्हनचे मालक आहे मी त्यांचं नाव घेत नाही. खासगी जागेतून रस्ता बंद केला होता” असं प्रताप सरनाईक म्हणाले. प्रताप सरनाईक हे ठाण्यातील ओवळा-माजीवडा मतदारसंघातून आमदार आहे. त्यांच्या मतदारसंघातील काही भाग मीरा-भाईंदरमध्ये येतो. “संबंधित अधिकाऱ्याने विनिंती केली, तर त्यांनी म्हटलं की, माझ्या अनधिकृत बांधकामला परवानगी द्या, त्यानंतरच मी वाहने जाऊ देईन” असं प्रताप सरनाईक म्हणाले.

‘तो व्यक्ती शहराचं पाणी थांबवतो’

“जो व्यक्ती मीरा भाईंदर शहराचा मोठा नेता समजतो, माझ्यामुळे पाणी आलं. माझ्यामुळे मेट्रो आली. माझ्यामुळे शहराचा विकास झाला असा दावा करतो तो व्यक्ती शहराचं पाणी थांबवत असेल तर मी शिवसेना तर्फे त्याच्या निषेध करतो” असं प्रताप सरनाईक म्हणाले.

भाजप समर्थक आमदार गीता जैन यांनी सुद्धा नरेंद्र मेहता यांचा निषेध केला. “परवानगी आहे, त्याला कोणी थांबवू शकत नाही. जो स्वतः शहराचा विकास केला सांगतो, त्यांनी काम थांबवलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या कामाचं उद्घाटन त्यांनी केलं. ती योजना थांबवणाऱ्या व्यक्तीचा मी निषेध करते” असं गीता जैन म्हणाल्या.

आरोपांवर नरेंद्र मेहता यांचं म्हणण काय?

“दोन्ही अपयशी आमदार आहेत. जनता त्यांच्याकडे विचारणा करतेय, सूर्या योजनेच काम 2022 मध्ये पूर्ण होणार होतं, त्याचं काय झालं?. शहरात प्रतिदिन तीन कोटी लिटर पाणी कमी येतय. शहराची लोकसंख्या वाढली, पाणी वाढलं पाहिजे होतं, परंतु पाणी कमी झालं. यांच्याकडे उत्तर नाही तर आमच्यावर खापर फोडायच” असं नरेंद्र मेहता म्हणाले.

Non Stop LIVE Update
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'.
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?.
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'.
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास.
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल.
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?.
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.