‘मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते, हीच का लाडकी बहीण योजना?’; राज ठाकरे यांचा घणाघात

"महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करायचा आहे का? मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाआधी एक बाई भोजपूरी गाण्यावर नाचतेय आहे. ही लाडकी बहीण योजना आहे? आपण कुठे चाललो आहोत. व्यासपीठावर नाचायला मुली आणल्या जाताय. या घाणेरड्या राजकारणापासून महाराष्ट्र वाचवायचा आहे", असं राज ठाकरे म्हणाले.

'मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते, हीच का लाडकी बहीण योजना?'; राज ठाकरे यांचा घणाघात
'मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते, हीच का लाडकी बहीण योजना?'; राज ठाकरे यांचा घणाघात
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 7:54 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. राज ठाकरे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघापासून विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात केली. ज्या जागांवर जिंकून येण्याची शक्यता आहे त्या जागांवर आपण आधी सभा घेत असल्याचं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाचा सुरुवातीलाच जाहीर केलं. यानंतर राज ठाकरे यांनी राज्यातील गेल्या काही वर्षांपासूनच्या राजकीय घडामोडींवर रोखठोक भाष्य केलं. त्यांनी पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. पण त्यांनी भाजपच्या विरोधात भूमिका मांडली नाही. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करतही निशाणा साधला.

“महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करायचा आहे का? मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाआधी एक बाई भोजपूरी गाण्यावर नाचतेय आहे. ही लाडकी बहीण योजना आहे? आपण कुठे चाललो आहोत. व्यासपीठावर नाचायला मुली आणल्या जाताय. या घाणेरड्या राजकारणापासून महाराष्ट्र वाचवायचा आहे. कोणत्याही पक्षापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. महाराष्ट्र बरबाद झाला तर छत्रपतींचं नाव घेता येणार नाही. इतके प्रश्न प्रलंबित असताना चेष्टा सुरु आहे. जिंवत आहात ना? जागे आहात ना? १५ तारखेला पुन्हा सभा आहे. इतर गोष्टींवर तेव्हा बोलेन. इतकंच सांगणं आहे महाराष्ट्रासाठी जागे व्हा. अनेकांचा डोळा या महाराष्ट्रावर आहे. तुमचं यावर लक्ष असलं पाहिजे. हे जे सगळं सुरु आहे ते तुम्ही बंद केले पाहिजे. एकदा माझाकडे सत्ता देऊन बघा”, असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, काय-काय म्हणाले?

  • “अडीच वर्षे संपली तेव्हा हे इकडेच बघत होते, खालच्या खाली 40 आमदार गेले. ते निसर्ग पाहायला गेले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्ता नाही. चाळीसगाव घेऊन जाणारे एकनाथ शिंदे हे काँग्रेस, एनसीपी आणि अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. मात्र अजित पवार मांडीवर येऊन बसले. काय राजकारण सुरु आहे? त्यांना आम्ही कसेही वागू, पैसे फेकून मारू आणि निवडून येऊ असं वाटतं आहे”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
  • “गद्दारी केलेले लोक आधी खाली मान टाकून जायची. मात्र आता यांना भीती वाटत नाही. फोडा फोडीचे राजकारणाला शरद पवार यांनी सुरुवात केली. त्यांनी आधी काँग्रेस फोडली, नारायण राणे फोडले, आता हे राजकारण. संपलं, आता पक्ष ताब्यात घेतात. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची नाहीत बाळासाहेबांची आहेत. घड्याळ आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचे अपत्य आहेत”, असं राज ठाकरे स्पष्ट म्हणाले,
  • “या सर्व गोष्टी उत्तर प्रदेशमध्ये होतात. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा आहे काय? मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवरती भोजपुरी गाण्यावर बाई नाचते. ही लाडकी बहीण योजना का? व्यासपीठावरती मुली नाचवायचं हे कोणाचं डोकं आहे? एकनाथ शिंदे यांनीही लक्ष दिले पाहिजे. पक्षापेक्षा महाराष्ट्र मोठा असा इतिहास सांगणाऱ्या महाराष्ट्रात व्यासपीठावर मुली नाचवतात. अनेक प्रश्न प्रलंबित असताना आमच्याकडे मजा चालू आहे”, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
Non Stop LIVE Update
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'.
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?.
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय.