AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivali Banner : डोंबिवलीतील ‘तो’ मनसेचा बॅनर ठरतोय लक्षवेधी, शिवसेनेला केले टिकेचे लक्ष्य

एमआयडीसीतील रस्त्यांसाठी 110 कोटी रुपये मंजू केल्याचे बॅनर शिवसेनेच्या वतीने लावण्यात आले होते. या बॅनरवर टिका करणारा एक पोस्ट कार्ड फॉरमॅटमधील मजकूराचा बॅनर मनसेच्या शहर शाखेच्या वतीने डोंबिवलीत झळकला आहे. मनसेच्या या टिकेला आता शिवसेना काय उत्तर देणार याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.

Dombivali Banner : डोंबिवलीतील 'तो' मनसेचा बॅनर ठरतोय लक्षवेधी, शिवसेनेला केले टिकेचे लक्ष्य
डोंबिवलीतील 'तो' मनसेचा बॅनर ठरतोय लक्षवेधी
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 5:04 PM

डोंबिवली : निवडणुकीवरुन औरंगाबादमध्ये लावलेल्या बॅनरची राज्यात चर्चा असतानाच आज डोंबिवलीतील पोस्टकार्ड बॅनर चर्चेत आले आहे. विकास कामांवरुन मनसे(MNS)ने डोंबिवलीत एक लक्षवेधी बॅनर(Banner) लावला आहे. पोस्टकार्ड फॉरमॅट असलेल्या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेवर टिका करण्यात आली आहे. ”कधी तरी तयार झालेला रस्ता सुद्धा दाखवा” असे या बॅनरवर लिहण्यात आले आहे. आपले कृपाभिलाषी त्रसलेले डोंबिवलीकर. होर्डिग आणि बॅनरबाज मंडळी डोंबिवली परिसर पिनकोडचा उल्लेख केलेला आहे. एमआयडीसी विभागात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून रस्ते विकासासाठी 110 कोटी रुपये मंजूर झाल्याचे बॅनर लावण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर ही बॅनर बाजी करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्वेतील मिलाप नगर परिसरात हा बॅनर लावण्यात आला आहे. (MNS criticizes Shiv Sena over banner hoarding in Dombivali)

शिवसेनेच्या निधी मंजूर बॅनरवर मनसेची टीका

एमआयडीसीतील रस्त्यांसाठी 110 कोटी रुपये मंजू केल्याचे बॅनर शिवसेनेच्या वतीने लावण्यात आले होते. या बॅनरवर टिका करणारा एक पोस्ट कार्ड फॉरमॅटमधील मजकूराचा बॅनर मनसेच्या शहर शाखेच्या वतीने डोंबिवलीत झळकला आहे. मनसेच्या या टिकेला आता शिवसेना काय उत्तर देणार याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे. या पोस्टकार्ड फॉरमॅटवरील बॅनरवर ”श्री श्रेयस निधी मंजूरकर ह्यांस कोपरापासून हात जोडून नमस्कार, सालाबाद प्रमाणे एमआयडीसीत रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याचे बॅनर लावण्यात आहे आहेत. कधी तरी झालेला रस्ता सुद्धा दाखवा. आपले कृपाभिलाषी त्रसलेले डोंबिवलीकर. होर्डिग आणि बॅनरबाज मंडळी” असे लिहिण्यात आले असून डोंबिवली परिसर पिनकोडचा उल्लेख केलेला आहे.

या पोस्टकार्डवर जो ठप्पा मारला आहे. त्याठिकाणी शिवसेनेचा वाघ दाखविण्यात आला आहे. यापूर्वीही रस्त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. त्याचे बॅनर शिवसेनेकडून लावण्यात आले होते. यावर ते बॅनर फाटायला आले तरी रस्ते मात्र कुठे दिसत नाही अशी टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली होती. या टिकेनंतर आता पुन्हा मनसेने हा बॅनर लावून शिवसेनेला टिकेचे लक्ष्य केले आहे.

औरंगाबादमध्येही निवडणुकीसाठी बायको पाहिजे बॅनरची चर्चा

औरंगाबादमध्ये रविवारी निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. रमेश पाटील या व्यक्तीने शहरातील विविध चौकात हे बॅनर लावले होते. यामुळे शहरात वाद चिघळला होता. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी या बॅनरवर आक्षेप घेत सर्व फाडून बॅनर फाडून टाकले. तसेच बॅनर लावणाऱ्या रमेश पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली. रमेश पाटील हा प्लॉटिंग व्यावसायिक असून या व्यक्तीला तीन अपत्ये असल्यामुळे निवडणूक लढवता येत नाही आहे. त्यामुळे त्याने शहरात असे मजेशीर बॅनर लावले असून बॅनरवर त्याने बायको कशी हवी ते ही सविस्तर लिहिले आहे. (MNS criticizes Shiv Sena over banner hoarding in Dombivali)

इतर बातम्या

कोण आहे हिंदुस्थानी भाऊ, ज्याच्या आवाहनावर मुंबईत शेकडो विद्यार्थ्यांनी ठाकरे सरकारला घामटा फोडला?

माझे भाषण संपताच व्हॉट्सअ‍ॅपवरून संपूर्ण उत्तर प्रदेशात पाठवा, जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....