MNS vs Shiv Sena : वचननाम्याप्रमाणं ठाणेकरांचं एकही काम न करता फसवणूक केली, अभिजित पानसेंचा आरोप
शिवसेने(Shivsena)नं आपल्या वचननाम्याप्रमाणं ठाणेकरांचं एकही काम केलं नाही. इथल्या जनतेची फसवणूक केलीय, असा आरोप मनसे नेते अभिजित पानसे (MNS leader Abhijeet Panse) आणि अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी केलाय. याविरोधात विरोधात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत जनजागरण मोर्चा काढणार असल्याचे ते म्हणाले.
ठाणे : गेल्या 10 वर्षामध्ये ठाण्यात शिवसेने(Shivsena)नं आपल्या वचननाम्याप्रमाणं ठाणेकरांचं एकही काम केलं नाही. इथल्या जनतेची फसवणूक केलीय, असा आरोप मनसे नेते अभिजित पानसे (MNS leader Abhijeet Panse) आणि अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी केलाय.
‘ठाणेकरांची फसवणूक’ ते म्हणाले, की ठाणे महापालिके(Thane Municipal Corporation)च्या सार्वत्रिक निवडणूक 2017रोजी शिवसेना या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात अनेक लेखी आश्वासनं देऊन घरोघरी जाऊन छापील पत्रकं वाटली होती. मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता न करता ठाणेकरांची फसवणूक केली असा आरोप त्यांनी केला.
‘मोर्चा काढणार’ मनसेच्या वतीने सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत जनजागरण मोर्चा काढणार असल्याचे ते म्हणाले.
‘काय आश्वासनं दिली होती?’ महापालिका हद्दीत शिवसेनेच्या वतीने आरोग्य कवच योजना, धरण क्षेत्र, 30 एकरमध्ये सेंटर पार्क, धरण बांधकाम, क्लस्टर योजना, 500 चौरस फूट कर माफ, जल वाहतूक सुविधा अशी अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र यातलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही, असा आरोप मनसेतर्फे करण्यात आलाय.