मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई, त्यांनी प्रदुषणावर लक्ष घालावं, आता अधिकाऱ्यांना धुण्याची वेळ, मनसेचा इशारा

"आता अधिकाऱ्यांना धुण्याची वेळ जवळ आली आहे. अधिकाऱ्यांना हा शेवटचा इशारा आहे", असा सज्जड दम मनसेचे डोंबिवली अध्यक्ष राजेश कदम यांनी दिला आहे (MNS leader Rajesh Kadam appeal CM Uddhav Thackeray on pollution issue of Dombivli).

मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई, त्यांनी प्रदुषणावर लक्ष घालावं, आता अधिकाऱ्यांना धुण्याची वेळ, मनसेचा इशारा
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 9:18 PM

ठाणे :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे डोंबिवलीचे जावई आहेत. पर्यावरण मत्री आदित्य ठाकरे यांचे डोंबिवली हे आजोळ आहे. ते डोंबिवलीतील प्रदूषण दूर करण्यासाठी काही तरी लक्ष घातलीत. मात्र डोंबिवलीतील प्रदूषणाने आता सिमा गाठली आहे. कारखान्यातील चिमणीतून धूर ओकला जात आहे. तसेच काहीही कचरा कुठेही जाळला जात आहे. आता अधिकाऱ्यांनाही धुण्याची वेळ जवळ आली आहे. अधिकाऱ्यांना हा शेवटचा इशारा आहे”, असा सज्जड दम मनसेचे डोंबिवली अध्यक्ष राजेश कदम यांनी दिला आहे (MNS leader Rajesh Kadam appeal CM Uddhav Thackeray on pollution issue of Dombivli).

“डोंबिवलीतील औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून आहे. मागच्या सरकारने प्रदूषण दूर करण्यासाठी काही एक प्रयत्न केले नाहीत. आताच्या सरकारकडून डोंबिवलीकरांच्या अपेक्षा होत्या. फेब्रुवारी महिन्यात प्रदूषित पाण्यामुळे रस्ता गुलाबी झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी रस्त्यावर प्रदूषित निळे पाणी वाहत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचबरोबर 2014 मध्ये प्रदूषणामुळे हिरवा पाऊस पडला होता”, असं राजेश कदम म्हणाले.

डोंबिवलीतील प्रदूषणाचा प्रश्न अद्याप सूटलेला नाही. फेब्रुवारी महिन्यात गुलाबी रस्ते प्रकरणी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डोंबिवलीत आले होते. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील सोबत होते. मात्र त्यानंतर केवळ 302 कारखान्यांचे सर्वेक्षण केले गेले. तसेच औद्योगिक सुरक्षा ऑडीट न करणाऱ्या 38 कारखान्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

कोरोना काळात कारखाने बंद होते. अनलॉक काळात कारखाने सुरु झालेले आहे. आता पुन्हा प्रदूषणाची गंगा वाहू लागली आहे. डोंबिवलीतील एका कारखान्यातून काळा धूर बाहेरच्या वातावरणा फेकला जात आहे. तसेच डोंबिवलीत रासायनिक कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट न लावता तो उघड्यावर जाळला जात आहे. या सगळ्यांकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी डोळेझाक करीत आहेत.

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय त्यांच्याकडून दखल घेतली जाणार नाही, असा इशारा दिला होता. त्याच इशाऱ्याचा पुनरुच्चार करीत मनसेचे डोंबिवली अध्यक्ष राजेश कदम यांनी आता शेवटचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळास दिला आहे, असं सांगितलं (MNS leader Rajesh Kadam appeal CM Uddhav Thackeray on pollution issue of Dombivli).

हेही वाचा : राज ठाकरेंची मराठी माणसाबद्दलची भूमिका मान्य, पण आमचं हिंदुत्व व्यापक : देवेंद्र फडणवीस

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.