AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमधील खड्डे भरा नाही तर तुम्हालाच खड्ड्यात भरू; मनसे आमदार राजू पाटील संतप्त

कल्याणमधील खड्डे तातडीने भरा नाही तर आम्हालाच तुम्हाला खड्ड्यता भरावे लागेल, असा संतप्त इशारा राजू पाटील यांनी दिला आहे. (mns leader raju patil attacks kdmc over pothole in kalyan)

कल्याणमधील खड्डे भरा नाही तर तुम्हालाच खड्ड्यात भरू; मनसे आमदार राजू पाटील संतप्त
raju patil
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 3:49 PM

कल्याण: कल्याणमधील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य झाल्याने मनसेचे आमदार राजू पाटील प्रचंड संतापले आहेत. कल्याणमधील खड्डे तातडीने भरा नाही तर आम्हालाच तुम्हाला खड्ड्यता भरावे लागेल, असा संतप्त इशारा राजू पाटील यांनी दिला आहे.

राजू पाटील यांनी आज कल्याण पूर्वेतील मलंग रोडवरील रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक कुणाल पाटील, हरीश जोशी, कंत्राटदार कंपनीच्या अभियंता अरुण पाटील आणि महेश गुप्ते उपस्थित होते. रस्त्याची दुरवस्था पाहून राजू पाटील यांनी सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरले. सत्ताधारी वाघाच्या वाटा खात आहे. कल्याण-डोंबिवलीची वाट लावून ठेवली आहे. पालकमंत्र्यांनी स्वत: कल्याणमध्ये येऊन रस्त्यांची पाहणी करावी, असं पाटील यांनी पालकमंत्र्यांना केले.

आता सहनशीलतेचा अंत झाला

कल्याण-डोंबिवलीतील खड्डे बुजविण्यावर 114 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्याबाबत पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावर 114 कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी खर्च केल्याचं दिसतंय का? असा प्रतिसवाल त्यांनी केला. खड्डय़ाचे सोडा पालिकेतील अधिकारी बिले काढण्यासाठी 2 टक्के घेतात. सगळीकडे अडवणूक, फसवणूक सुरू आहे. एक तर लोकप्रतिनिधी नाहीत. प्रशासक आहे. कशाला कशाचा पायपोस नाही. खड्डे बुजविण्यासाठी आठ वर्षात 114 कोटी रुपये खर्च करुन दरवर्षी हीच परिस्थिती असते. त्यामुळे आता यांनी खड्डे भरावेत नाही तर आम्हालाच यांना खड्ड्यात भरावे लागेल, असा संतप्त इशारा त्यांनी दिला. आम्ही काय करू शकतो हे सर्वांना माहीत आहे. आमच्यावर केसेस केल्या तरी करू द्या. आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. कल्याणमध्ये सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

ब्लॅकलिस्टेड कंपनीला रस्त्याचे काम

कल्याणच्या मलंग रस्त्यावर 45 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. तरीही या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. 31 मे 2019 रोजी हा रस्ता पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याला वाढीव पैसे दिले जात आहेत. तसेच कंत्राटदाराला मुदतवाढ दिली असून तीही संपुष्टात आली आहे. बहुतेक त्याला मुदतवाढ देणारा खाल्ल्या मिठाला जागत असावा. या रस्त्याच्या कामाचे 95 टक्के बिल कंत्राट कंपनीला आधीच दिले गेले आहे. हे काम ज्या कंत्राट कंपनीला दिले होते. ती रेलकॉन कंपनी मुंबईत ब्लॅकलिस्टेड आहे. ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना कामे दिली तर हीच परिस्थिती होणार. मलंग रस्त्याचीच नव्हे संपूर्ण कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची अवस्थाही अत्यंत खराब आहे. पालकमंत्र्यांनी वेळ काढून या खड्ड्यांची पाहणी करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

आयुक्त अजून कलेक्टर मोडमध्येच

आमचे आयुक्तसाहेब तर हे कलेक्टर मोडमधून अद्याप आयुक्त मोडमध्ये आलेले नाही. आयुक्त केवळ खुर्च्या उबवायला बसले आहेत. कुठलीही कामे करीत नाहीत. कुणाल पाटील यांनी स्वखर्चाने खड्डे बुजविले होते. प्रशासन कोणाचीच दखल घेत नाही. यांना लाजा वाटायला पाहिजेत, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आज पाहणीला येणार असे सांगितल्यावर काही मुख्य अधिकारी आजारी पडल्याचे सांगत आहेत. कोणाला कोणाचा पायपोस नाही. एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचं काम सुरू आहे. सत्ताधाऱ्यांनी या शहराची वाईट परिस्थिती करून ठेवली असून कल्याण-डोंबिवलीची वाट लावली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

आता तरी जागे व्हा

कल्याणमधील खड्ड्यांबाबत आम्ही प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली आहे. त्यांना खड्डे बुजवण्याची विनंतीही केली आहे. मात्र, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये म्हणून शेवटी मला स्वखर्चाने खड्डे बुजवावे लागले, असं सांगतानाच आता तरी प्रशासनाने यातून धडा घेऊन जागं झालं पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या:

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्लानिंग करा, कायदा राबवण्याची वेळ येऊ देऊ नका; एकनाथ शिंदेंची अधिकाऱ्यांना तंबी

धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द

पावसाच्या पाण्याने पाय घसरुन पडला, रस्ता नसल्याने तीन फूट पाण्यातून अंत्ययात्रा निघाली

(mns leader raju patil attacks kdmc over pothole in kalyan)

एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.