AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Patil : केसेसचा दबाव टाकून शिवसेनेत घेतलं, माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाबाबत राजू पाटील यांची प्रतिक्रिया

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. यानंतर मनसेच्या या माजी नगरसेवकांना केसेसची भीती दाखवत दबाव टाकून शिवसेनेत प्रवेश करायला भाग पाडल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला.

Raju Patil : केसेसचा दबाव टाकून शिवसेनेत घेतलं, माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाबाबत राजू पाटील यांची प्रतिक्रिया
माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाबाबत राजू पाटील यांची प्रतिक्रियाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 8:56 PM

डोंबिवली : डोंबिवलीतील मनसेच्या तालुकाप्रमुखासह माजी नगरसेविकेनं आज शिवसेने (Shivsena)त प्रवेश केला. यानंतर केसेसची भीती दाखवून दबाव टाकत शिवसेनेत प्रवेश करायला भाग पाडलं जात असल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी केलाय. तर शिवसेनेत प्रवेश केलेल्या मनसेच्या तालुका प्रमुखाने मात्र मनसेच्या आमदारांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. डोंबिवलीतील मनसेचे तालुकाप्रमुख आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गजानन पाटील, काटईच्या माजी नगरसेविका पूजा गजानन पाटील, माजी नगरसेवक आणि जिल्हा सचिव प्रकाश माने, शहर संघटक संजीव ताम्हणे यांच्यासह मनसेच्या डोंबिवलीतील एकूण 11 पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. (MNS MLA Raju Patil reaction regarding former MNS corporators entry into Shiv Sena)

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. यानंतर मनसेच्या या माजी नगरसेवकांना केसेसची भीती दाखवत दबाव टाकून शिवसेनेत प्रवेश करायला भाग पाडल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला. गजानन आणि पूजा पाटील हे कालच मला येऊन भेटले. त्यांच्या काही अडचणी दाखवून त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. त्यांनी त्यांची मजबुरी सांगितली. एमआरटीपीच्या काही केसेस काढून भविष्यात त्रास दिला जाऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली. त्यावर आम्ही तुम्हाला सध्या प्रोटेक्क्ट नाही करू शकत, त्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर जा, असं त्यांना सांगितल्याची माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली.

घाणेरडं राजकारण करुन पक्ष वाढवणं दुर्दैवी

अशाप्रकारचं घाणेरडं राजकारण करून जर आपला पक्ष कुणी वाढवत असेल, तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही. आपापला पक्ष प्रत्येकाने वाढवावा, पण खुशीने कुणी येत असेल तर घ्या. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. पण इथे तसं होताना दिसत नाही. आमच्याकडेही खूप लोक यायला तयार असतात, पण कुणाच्या पदरात हात टाकायला आमच्या राजसाहेबांनी आम्हाला शिकवलेलं नाही. दुर्दैवाने समोरच्या पक्षात असं शिकवणारा सध्या तरी कुणी दिसत नाही. त्यामुळं ते त्यांची तत्व, ध्येय, धोरणं घेऊन पुढे चाललेत. ही त्यांची लुटमारीची जुनी सवय आहे, अशा शब्दात मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली. तर पक्षप्रमुखच कोट्या मनाचे आहेत, त्यांच्या पिल्लांकडून काय अपेक्षा करणार? असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं.

हे सुद्धा वाचा

आमच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही : गजानन पाटील

दरम्यान, राजू पाटील यांनी केलेल्या या आरोपांवर मनसे सोडून शिवसेनेत गेलेले मनसेचे माजी तालुकाप्रमुख गजानन पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये जे विकासाचे वारे वाहतायत, तो विकास आमच्या प्रभागात व्हावा, ही प्रामाणिक इच्छा असून पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून तो विकास होईल, ही आशा असल्यानेच आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याची माहिती गजानन पाटील यांनी दिली आहे.

येत्या काळात शिवसेना-मनसे संघर्ष वाढण्याची शक्यता

डोंबिवली आणि त्यालगतच्या ग्रामीण परिसरात असलेला कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा मनसे आमदार राजू पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याच परिसरावर लक्ष केंद्रित केलं असून मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष राजेश कदम, काटईचे अर्जुन पाटील, आता तालुकाप्रमुख गजानन पाटील आणि मनसे आमदार ज्या प्रभागात राहतात त्या प्रभागाच्या नगरसेविका पूजा पाटील यांनाही शिवसेनेनं गळाला लावलं आहे. त्यामुळं येत्या काळात शिवसेना-मनसे संघर्ष वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (MNS MLA Raju Patil reaction regarding former MNS corporators entry into Shiv Sena)

पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती.
Toolkit दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे 'हे' 4 कोड असतात महत्त्वाचे
Toolkit दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे 'हे' 4 कोड असतात महत्त्वाचे.
पाक लष्करानंतर नागरिकांमध्ये घाबरगुंडी; Google वर एकच गोष्ट करताय सर्च
पाक लष्करानंतर नागरिकांमध्ये घाबरगुंडी; Google वर एकच गोष्ट करताय सर्च.