Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Patil : ऐरोली काटई टनेल 10 आणि मेट्रो 15 वर्षे डोंबिवलीत येणार नाही, या फक्त नेहमीप्रमाणेच थापा : राजू पाटील

हे बजेट सर्व समावेश असावे. महिलांसाठी काही नाही. सुतिका गृहाची इतकी चांगली जागा पडलेली असताना त्यांच्याबद्दल काही नाही. हे फक्त आकडेमोड करुन करणारे बजेट आहे. हे बघून बजेट मला समाधानकार वाटले नाही, असे पाटील म्हणाले.

Raju Patil : ऐरोली काटई टनेल 10 आणि मेट्रो 15 वर्षे डोंबिवलीत येणार नाही, या फक्त नेहमीप्रमाणेच थापा : राजू पाटील
मनसे आमदार राजू पाटील
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 12:07 AM

कल्याण : रस्ते चंद्रासारखे आहेत आणि बजेटमध्ये तारांगण तयार करण्याच्या गोष्टी करतात. बजेट सर्व समावेश पाहिजे होते. तसे झाले नाही अशी टीका मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी नुकतीच केडीएमसी आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटवर केली आहे. इतकेच नाही तर ऐरोली काटई टनेल येणाऱ्या 10 वर्षात पूर्ण होणार नाही आणि मेट्रो 15 वर्षे डोंबिवलीत येणार डोंबिवलीत नाही हे फक्त थापा मारण्याच्या गोष्टी आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेचे बजेट (KDMC Budget) केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकतेच सादर केले. या बजेटवर मनसे आमदार राजू पाटील यांनी सडेतोड टीका केली आहे. या बजेटमध्ये आरोग्यावर आणि अन्य बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मात्र या बजेटवर मनसे आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (MNS MLA Raju Patil’s reaction on Kalyan Dombivali Municipal Corporation budget)

या बजेटमध्ये तारांगण तयार करण्याचे सांगण्यात आले आहे. रस्ते चंद्रासारखे आहेत आणि तारांगण तयार करण्याच्या गोष्टी केल्या जातात. तारांगणाची गरज आहे का आपल्याला असा सवाल उपस्थित आहे. हे बजेट सर्व समावेश असावे. महिलांसाठी काही नाही. सुतिका गृहाची इतकी चांगली जागा पडलेली असताना त्यांच्याबद्दल काही नाही. हे फक्त आकडेमोड करुन करणारे बजेट आहे. हे बघून बजेट मला समाधानकार वाटले नाही, असे पाटील म्हणाले.

प्रकल्प संदर्भात राजू पाटील यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

आपल्याकडे घोषणाच होते. आपल्याकडे कुठलाच प्रकल्प येत नाही. मी लिहून देतो ऐरोली टनेल 10 वर्षे होणार नाही. मेट्रोची वाट डोंबिवलीकरांना अजून 15 वर्षे पाहावी लागेल. पब्लिक ट्रानस्पोर्टची सुधारणा होत नाही. हे फक्त नेहमीप्रमाणे थापा मारतात अशी टीका आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. अनधिकृत बांधकाम म्हणजे आयुक्त तीन महिन्यांत 20 हजार बेकायदा बांधकामे तोडणार. त्याच्यात त्यांनी प्रायोरिटी दिली होती. जे आरक्षित प्लॉट आहेत. खेळाची मैदाने असतील, रस्त्यामध्ये असलेल्या इमारती असतील. ते हटवले पाहिजे. 2016 पासून पलावा जंक्शन येथे काही अनधिकृत बांधकामे आहे. त्यांना त्यांचा मोबदला देऊन ते रस्ते खुले केले तर वाहतूक कोंडीची समस्या होणार नाही. आमदार झाल्यापासून शीळ फाटा रोडला सतत ड्राईव्ह घेत असतो त्यात सतत खीळ घातली जाते, असा आरोपही आमदार राजू पाटील यांनी केला. (MNS MLA Raju Patil’s reaction on Kalyan Dombivali Municipal Corporation budget)

इतर बातम्या

प्रत्येक पक्षात नारद असतात, त्यांना सांभाळलं तरच निवडणुका मविआ म्हणून लढू, गुलाबराव पाटील यांच्या निशाण्यावर कोण?

धारावी पुनर्वसन प्रकल्पातील 800 कोटींच्या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा, नाना पटोलेंची मागणी

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.