AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनधिकृत बांधकामे सोडून आमची मंदिरे तोडणार तर उद्रेक होणारच; राजू पाटील यांचा सज्जड इशारा

राजू पाटील यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. या मुद्यावर बोलताना राजू पाटील यांनी सांगितले की, हे अधिकारी आणि त्यांचे आका हे हिंदुत्व विसरले आहेत. हिंदू ह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित्त गावातील मंदिरावर कारवाई झाली.

अनधिकृत बांधकामे सोडून आमची मंदिरे तोडणार तर उद्रेक होणारच; राजू पाटील यांचा सज्जड इशारा
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 11:58 PM

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने परिसरातील जुने गावदेवी मंदिर जीर्ण झाल्याने त्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी स्थानिकांनी मंदिराचे नव्याने बांधकाम सुरु केले. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी या बांधकामाला बेकायदेशीर ठरवीत कारवाई केली. या कारवाई विरेाधात स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी प्रभाग कार्यालयात पोहचून सहाय्यक आयुक्त सावंत यांच्या कानशीलात लगावली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मुकंद कोट यांच्यासह 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर राजकारण तापले आहे.

मनसे, भाजपचा मुकुंद कोट यांना पाठिंबा

मनसे आमदार राजू पाटील हे कारवाई करण्यात असलेल्या मंदिराच्या ठिकाणी पोहचले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी गावातील मंदिर तोडण्यात आले, ही लाजीरवाणी गोष्टी आहे. अनधिकृत बांधकामे सोडून कारवाई करणार तर उद्रेक होणारच असा सज्जड इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना दिला आहे. तर भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनीही हिंदुत्व आणि मंदिरासाठी मुकुंद कोट यांची भूमिका फार महत्वाची असल्याचे सांगत त्यांना पाठिंबा दिला आहे.

अधिकाऱ्याने गावाची आणि समाजाची माफी मागावी

राजू पाटील यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. या मुद्यावर बोलताना राजू पाटील यांनी सांगितले की, हे अधिकारी आणि त्यांचे आका हे हिंदुत्व विसरले आहेत. हिंदू ह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित्त गावातील मंदिरावर कारवाई झाली. सर्रासपणे अनधिकृत बांधकामे सुरु आहे. ती बांधकामे अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांना दिसत नाहीत. ज्या अधिकाऱ्याने ही कारवाई केली आहे. त्या अधिकाऱ्याने संपूर्ण गावाची आणि समाजाची माफी मागावी. नंतर आम्ही त्यांना कुठे बेकायदा बांधकाम सुरु आहेत, हे दाखवू. अनधिकृत बांधकामे सोडून मंदिरावर कारवाई करणार तर उद्रेक होणारच असा इशारा पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. (MNS MLA Raju Patil’s warning to the administration and the ruling party)

इतर बातम्या

CCTV | नव्या-कोऱ्या मोबाईलला हातही लावला नाही, बदलापुरात दुरुस्तीसाठी आलेल्या फोनवर चोरट्यांचा डल्ला

‘कोट यांची भूमिका हिंदुत्व, मंदिरासाठी महत्त्वाची,’ भाजप आमदाराकडून शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे समर्थन, कल्याणमध्ये नेमकं काय घडलं ?

वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा.
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा.
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार.