उल्हासनगरात महावितरणच्या सिक्युरिटी डिपॉझिटला मनसेचा विरोध, आंदोलनाचा इशारा

उल्हासनगरात मनसेने महावितरण कार्यालयात धडक दिली आहे. महावितरणकडून ग्राहकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

उल्हासनगरात महावितरणच्या सिक्युरिटी डिपॉझिटला मनसेचा विरोध, आंदोलनाचा इशारा
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 11:46 AM

निनाद करमरकर, उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये मनसेनं ( MNS ) महावितरण कार्यालयावर धडक दिली. महावितरणकडून अतिरिक्त सिक्युरिटी डिपॉझिटची बिलं ग्राहकांना पाठवण्यात आली असून त्याची जोरजबरदस्तीने वसुली करत ग्राहकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेने याला विरोध केला आहे. दरवर्षी अशाप्रकारे डिपॉझिट बिल ग्राहकांना पाठवले जातात.

महावितरण कार्यालयात धडक

उल्हासनगरमधील वीज ग्राहकांना महावितरणने अव्वाच्या सव्वा अतिरिक्त सिक्युरिटी डिपॉझिटची बिलं पाठवली आहेत. हे डिपॉझिट वसूल करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे वागत ग्राहकांना त्रास देत असल्याचा मनसेचा आरोप आहे. याविरोधात मनसेनं उल्हासनगरच्या महावितरण कार्यालयात धडक दिली.

सिक्युरिटी डिपॉझिट न घेण्याची मागणी मनसेनं केली, सोबतच जर महावितरण कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीत बदल झाला नाही, तर मनसे स्टाईलने धडा शिकवण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला आहे.

‘मनसे स्टाईलने धडा शिकवू!’

‘कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवू! असा इशारा उल्हासनगर शहरातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी महावितरणाला दिला आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट भरणं कंपल्सरी नसल्याचं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.