डोंबिवलीत रोषणाई आधीच मनसेला पोलिसांची नोटीस; राजू पाटील यांची जोरदार टीका
मनसेकडूनही डोंबिवली अप्पा दातार चौकात दिवाळी पहाट साजरी केली जाते. त्यालाही परवानगी नाकारल्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी सावित्रीबाई नाट्यगृहात दिवाळी पहाटेचा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला.
डोंबिवली : दिवाळीनिमित्त डोंबिवलीतील अप्पा दातार चौकात आज दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यासाठी मनसेने संपूर्ण परिसरात रोषणाई केली आहे. या रोषणाईचा शुभारंभ मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते पार पडला. मात्र या कार्यक्रमाच्या आधीच मनसे शहराध्यक्षांना पोलिसांनी नोटीस बजावली. या नोटीशीवर राजू पाटील यांनी संताप व्यक्त करीत जोरदार टीका केली आहे. जनतेसाठी ही रोषणाई आहे. रोषणाईचे श्रेय घेऊ नये म्हणून नोटीस दिली, अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही, असे राजू पाटील म्हणाले. (MNS police notice regarding lighting in Dombivali; Strong criticism of Raju Patil)
मनसे सावित्रीबाई नाट्यगृहात दिवाळी पहाट साजरी करणार
काही लोकं कोत्या मनाचे असतात. त्यांच्याकडून आम्ही जास्त अपेक्षा ठेवत नाही. त्यांनी त्यांची रेषा मोठी करावी. दुसऱ्याची रेषा कमी करुन कोणी मोठा होत नाही, असा सल्ला दिवाळी निमित्त मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला आहे. कोरोनाचे नियम पाळून सण साजरा करावा असे आवाहन सरकारकडून केल जात आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी पहाट साजरी केली जाणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी नाकारली. आयोजकांना दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करावा लागला.
मनसेकडूनही डोंबिवली अप्पा दातार चौकात दिवाळी पहाट साजरी केली जाते. त्यालाही परवानगी नाकारल्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी सावित्रीबाई नाट्यगृहात दिवाळी पहाटेचा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. 4 तारखेला ही दिवाळी पहाट बंदीस्त नाट्यगृहात होणार आहे. त्याआधी मनसेने आज सायंकाळी अप्पा दातार चौकात दिपोत्सव साजरा केला. त्यासाठी मनसेने त्या परिसरात संपूर्ण रोषणाई केली आहे. या रोषणाईचा शुभारंभ मनसे आमदार राजू पाटील यांच्या ह्स्ते पार पडला. मात्र या कार्यक्रमाच्या आधीच मनसे शहराध्यक्षांना पोलिसांनी नोटीस बजावली.
ऐन दिवाळीत दिवा वासियांवर संक्रांत
दिवाळीच्या निमीत्तानं घरा-घरात साफसफाई करून किराणा माल भरून दिवाळी फराळ बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवा परिसरात रस्ता रूंदीकरणाच्या कामामुळे झालेल्या कारवाईनंतर प्रकल्पग्रस्त कुटुंबियांवर मात्र संक्रांत आली आहे. गेली 17-18 वर्षे ज्या घरात काढली, पै पै जमा करून संसार उभा केला, तो संसार एका दिवसात पालिकेनं केलेल्या कारवाईमुळे रस्त्यावर आलाय. याच प्रकल्पग्रस्तांना चार भिंतीचा आडोसा आणि डोक्यावर छप्पर मिळाले खरे; मात्र त्या भिंतीत तो आपलेपणा नसल्याची खंत दिवावासीयांची आहे. ऐन दिवाळी दरम्यान महापालिकेने कारवाई केल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आली. होत नव्हतं ते धुळीस मिळालं, महापालिका प्रशासनाने नागरिकांची गरज लक्षात घेता प्रकल्पग्रस्तांना पर्यायी म्हणून बीएसयूपी प्रकल्पात राहण्यास घर दिली मात्र तिथे देखील या नागरिकांच्या पदरात चिंताच पडली आहे. (MNS police notice regarding lighting in Dombivali; Strong criticism of Raju Patil)
राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा; नागरिकांनी दोन्ही डोसेस घेण्याचे मुख्यमंत्र्याचे आवाहनhttps://t.co/zESuokg8SE#Corona |#Vaccination |#Appeal |#UddhavThackarey
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2021
इतर बातम्या
दिवाळी धमाका ऑफर, दारुच्या बाटलीवर थंडगार बिस्लेरी मोफत, ठाण्यातील दुकानदाराची शक्कल
नकली सोन्याचे बिस्किटे विकून नागरिकांना फसविणारा डोंबिवलीतील भामटा गजाआड