Thane Morcha : सामाजिक सभागृहासाठी हाजुरीतील नागरिकांचा ठामपासमोर आक्रोश मोर्चा
हाजुरी येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यासाठी पालिकेने एक भूखंडदेखील राखीव ठेवला होता. मात्र, प्रत्यक्षात त्या ठिकाणी एडल्ट पॅराडाईज या प्रकल्पाची इमारत उभारण्यात येत आहे. त्यास स्थानिकांनी अनेकवेळा विरोध केला आहे. महापौर, आयुक्त यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या होत्या.
ठाणे : हाजुरीमध्ये कम्युनिटी हॉल (Community Hall) उभारावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी असूनही ही मागणी डावलून एडल्ट पॅराडाईज ही वास्तू बांधली जात आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच नागरिकांच्या मागणीप्रमाणे सामाजिक सभागृह उभारण्यात यावे, याकरीता हाजुरीमधील नागरिकांनी फिरोज पठाण यांच्या नेतृत्वाखाली ठामपावर आक्रोश मोर्चा (Morcha) नेला. हाजुरी येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यासाठी पालिकेने एक भूखंडदेखील राखीव ठेवला होता. मात्र, प्रत्यक्षात त्या ठिकाणी एडल्ट पॅराडाईज या प्रकल्पाची इमारत उभारण्यात येत आहे. त्यास स्थानिकांनी अनेकवेळा विरोध केला आहे. महापौर, आयुक्त यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने येथील नागरिकांनी ठाणे पालिका मुख्यालयावर मोर्चा नेला. मोर्चेकर्यांनी यावेळी, ठामपा आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Morcha of local citizens in front of Thane Municipal Corporation for social hall)
कम्युनिटी हॉल बांधण्याची स्थानिकांची मागणी
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या अंतिम भूखंड क्रमांक 136/बी/2 सविधा भूखंड येथे महापालिकेच्या वतीने एडल्ट पॅराडाइज हा बहुउद्देशीय प्रकल्प बनविण्यात येत आहे. सदर प्रकल्पांतर्गत इमारत बनवून त्यात विविध सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. मात्र, स्थानिक नागरिकांकडून या भागात कम्युनिटी हॉल बांधण्याची मागणी केली जात आहे. सदर सुविधा भूखंड महापालिकेच्या मालिकेचा असून सदर ठिकाणी कम्युनिटी हॉल बनविल्यास स्थानिक नागरिकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. स्थानिकांचे लग्न किंवा इतर कार्यक्रम या हॉलमध्ये माफक दरात करता येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी कम्युनिटी हॉल बांधून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना घडविणाऱ्या त्यांच्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे यांचे नाव सदर सभागृहास देण्यात यावे, अशी मागणी आपण केली आहे. मात्र, हाजुरीमध्ये बहुसंख्याक लोकवस्ती दलित आणि मुस्लीम समुदायाची असल्यानेच आयुक्तांनी मागणी फेटाळली आहे. हे आयुक्त मुस्लीम-दलितविरोधी आहेत, असा आरोप करुन सर्वधर्मियांसाठी कम्युनिटी हॉल न उभारल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी फिरोज पठाण यांनी दिला. (Morcha of local citizens in front of Thane Municipal Corporation for social hall)
इतर बातम्या
एखाद्याला मुलगा झाला तरी काही लोक श्रेय घेतात; फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांना टोला