मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी धरणावर, पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू, मृतदेहाचा शोध सुरु

मित्रांसोबत धरणावर पोहोण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शहापूर तालुक्यात घडली आहे. शनिवारी (10 जुलै) ही घटना घडली आहे.

मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी धरणावर, पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू, मृतदेहाचा शोध सुरु
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 8:10 AM

ठाणे : मित्रांसोबत धरणावर पोहोण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शहापूर तालुक्यात घडली आहे. शनिवारी (10 जुलै) ही घटना घडली आहे. मात्र अद्याप या तरुणांचा मृतदेह मिळाला आहे. सध्या या धरणात तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. (Mulund One Person drowned while swimming in Jambhe Dam Shahapur)

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू

शहापूर तालुक्यातील जांभे धरणात मुलुंडमधील एका 32 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. हा तरुण 10 जुलैला त्याच्या सहा मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला होता. हे सर्व मित्र जांभे धरणात पोहोण्यासाठी उतरले. त्यातील एका व्यक्तीला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

मृतदेहाचा शोध सुरु

दरम्यान अद्याप या तरुणाचा मृतदेह मिळालेला नाही. सध्या संपूर्ण धरण परिसरात शोधमोहिम सुरु आहे. काल रात्री उशिरापर्यंत धरणात शोधमोहिम राबवण्यात आली. मात्र अंधारामुळे शोधमोहिमेस अडचणी येत होत्या. यामुळे आज सकाळी पुन्हा धरण परिसरात शोध मोहिम राबवली जाणार आहे. या दुर्घटनेनंतर जांभे धरणावर फिरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

पर्यटनास बंदी असतानाही पर्यटक मौजमजेसाठी धरणावर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले, धरणे, तलाव ओसांडून वाहू लागले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात अनेक पर्यटक पर्यटन क्षेत्रावर फिरण्यासाठी गर्दी करतात. अनेक ठिकाणी पिकनिकला जाण्यास बंदी असतानाही पर्यटक फिरायला जातात. त्यामुळे या दुर्घटना घडत असल्याचे बोललं जात आहे.

बॅरेज धरणात बुडून मृत्यू, 24 तासांनंतर मृतदेह बाहेर

दरम्यान काही दिवसांपूर्वी बॅरेज धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बदलापुरात घडली होती. रविवारी (27 जून) ही घटना घडली. तुषार पाटील असे या तरुणाचे नाव होते. तो उल्हानगरला राहतो. तुषार हा मित्रांसोबत बदलापूर पश्चिमेकडील बॅरेज धरणावर पोहण्यासाठी गेला होता. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

तब्बल 24 तासांनंतर तुषारचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. यानंतर पंचनामा करून त्याचा मृतदेह बदलापूर ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.

(Mulund One Person drowned while swimming in Jambhe Dam Shahapur)

संबंधित बातम्या : 

मित्रांसोबत धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू, तब्बल 24 तासांनंतर मृतदेह पाण्याबाहेर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.