VIDEO | मुंबई-नाशिक महामार्गावर ‘द बर्निंग कार’चा थरार, भर रस्त्यात चालती गाडी पेटली

| Updated on: Jun 29, 2021 | 10:09 AM

अग्निशमन दलाने तात्काळ याची दखल घेत घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. (Mumbai-Nashik highway The Burning Car running on the road caught fire)

VIDEO | मुंबई-नाशिक महामार्गावर द बर्निंग कारचा थरार, भर रस्त्यात चालती गाडी पेटली
Mumbai-Nashik highway The Burning Car
Follow us on

शहापूर : मुंबई – नाशिक महामार्गावर ‘द बर्निंग कारचा’ थरार पाहायला मिळाला. शहापूरजवळ एका मालवाहतूक करणाऱ्या गाडीला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही गाडी आगीत पूर्ण जळून खाक झाली आहे. (Mumbai-Nashik highway The Burning Car running on the road caught fire)

सुदैवाने जीवितहानी नाही 

मुंबई – नाशिक महामार्गावर शहापूरजवळील चेरपोली पोलीस चौकीजवळ एका मालवाहतूक गाडीला रात्रीच्या वेळेस भीषण आग लागली. यावेळी भर रस्त्यात चालत्या गाडीने अचानक पेट घेतला. यामुळे ही गाडी आगीत पूर्ण जळून खाक झाली. मात्र प्रसंगावधान राखत ड्रायव्हर आणि क्लिनर वेळीच त्यातून बाहेर पडले. त्यामुळे ते सुखरुप बचावले.

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

मात्र या दुर्घटनेत ती मालवाहतूक गाडी पूर्ण जळून खाक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी भिवंडीतील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने तात्काळ याची दखल घेत घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवलं.

दरम्यान ही घटना नेमकी किती वाजता घडली? आग लागलेली गाडी नेमकी कोणाची होती? त्यात माल होता का? ती गाडी कुठून कुठे प्रवास करत होती? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पाहा व्हिडीओ :

(Mumbai-Nashik highway The Burning Car running on the road caught fire)

संबंधित बातम्या : 

VIDEO | कर्नाटकातून सांगलीत वाहतूक, मिरजेत 90 पोती गुटखा जप्त

हॉटेल पार्सल ते मसाजर घरी पाठवून छळ, वसईतील तरुणीला ऑनलाईन मित्राकडून त्रास

ऑनलाईन दारू मागवणं पडलं महागात, प्रख्यात अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक