“स्वच्छ सर्वेक्षण 2022” अंतर्गत विविध कामांचा महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी घेतला आढावा
महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी आज महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून केंद्र शासनाच्या वतीने सन 2022 साली होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमातंर्गत विविध घटकांची चर्चा करून त्यातील घटकनिहाय नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
ठाणे : ठाणे शहरात स्वच्छ भारत अभियानां (Swachh Bharat Abhiyan)तर्गत सुरू असलेल्या “स्वच्छ सर्वेक्षण 2022” (Clean Survey 2022) मोहिमेंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांचा महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी आज आढावा (Review) घेवून या स्पर्धेत देशात अव्वल येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना दिले. दरम्यान या मोहिमेंतर्गत येत्या 3 दिवसात शहर स्वच्छतेसह इतर अत्यावश्यक सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी ’स्वच्छ सर्वेक्षण 2022’या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (Municipal Additional Commissioner reviews various works under Clean Survey 2022)
घटकनिहाय नियोजन करण्याच्या सूचना
महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी आज महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून केंद्र शासनाच्या वतीने सन 2022 साली होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमातंर्गत विविध घटकांची चर्चा करून त्यातील घटकनिहाय नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्पर्धेत ठाणे शहर सहभागी झाले आहे. ठाणे शहराला स्वच्छ, सुंदर बनवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून महापालिकेच्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता, उप मुख्य स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता निरीक्षक यांनी कशा पद्धतीने या मोहिमेत काम केले पाहिजे याबाबत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी या बैठकीत निर्देश दिले.
अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश
शहरातील सार्वजनिक शौचालयातील नळ व्यवस्था, पाणी पुरवठा, साफसफाई, सार्वजनिक शौचालयांना नळ संयोजने, विद्युत व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था तसेच परिसर स्वच्छता आदी गोष्टी अद्ययावत ठेवून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान प्रत्येक प्रभाग समितिनिहाय शहरातील अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग तात्काळ काढून टाकण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले. (Municipal Additional Commissioner reviews various works under Clean Survey 2022)
इतर बातम्या
Akola Crime : अकोल्यात दोघांचे अपहरण करणाऱ्या 3 खंडणी बहाद्दरांना पोलिसांनी केली अटक
Kalyan Crime : घरफोडीचे 41 गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक